स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व !

‘आत्म्याचा रंग निळा आहे. अग्निचाही मूळ रंग निळा आहे. आत्मा ही एक ऊर्जा आहे. श्रीविष्णूचाही रंग निळा आहे. ब्रह्मांडाची स्थिती समतोल राखण्याचे कार्य महाविष्णु करतो. आत्मा जर अविनाशी आहे, तर त्यातील विष्णूतत्त्वाशी एकरूप होतांना आपल्यालाही आपल्या आत्मप्रकाशाशी अनुसंधान जोडावे लागेल. यासाठी आपल्याच अंतर्मनाशी आपल्याला एकरूप व्हावे लागेल. यासाठी आपल्याला तीव्र साधना करून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे; कारण आत्मा हा निर्विचारी आहे, तसेच तो स्वभावदोष आणि अहं विरहितही आहे.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ही आपल्या साधनेचा प्राण आहे. जसे प्राणाविना आपले जीवन मृतवत् आहे, तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविना आपले जीवनही प्राणहीन झाल्यासारखेच आहे.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment