मोक्षप्राप्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे सद्गुरुतत्त्व !

‘आयुर्वेदो अमृतानाम् ।’ म्हणजे ‘अमृतकर अशा गोष्टींमध्ये आयुर्वेद (आयुर्वेदप्रणीत तत्त्वे, पथ्य, नियम, औषधे) श्रेष्ठ आहे.’ त्याचप्रमाणे म्हणावेसे वाटते की, ‘सद्गुरुः मोक्षाय ।’ म्हणजे ‘मोक्षप्राप्तीची साधने, मार्ग अनंत असले, तरी त्यात सर्वश्रेष्ठ आहे ते सद्गुरुतत्त्व !’ (संदर्भ : ‘विश्‍वपंढरी’, फेब्रुवारी २००७)

भावासहीत नामजप पापाचा नाश करते !

‘नामजप जर भावासहीत केला, तर तो आपल्या प्रारब्धाची तीव्रता नष्ट करतो, तसेच त्यामुळे आपले संचित कर्म नष्ट करून आपल्यासाठी मुक्तीचे द्वार उघडतो. यन्नामकीर्तनं भक्त्या विलापनमनुत्तमम् । मैत्रेयाशेषपापानां धातूनामिव पावक: ॥ – विष्णुपुराण, अंश ६, अध्याय ८, श्‍लोक २० अर्थ : जसा अग्नी सुवर्णासारख्या धातूतील मळ जाळून नष्ट करतो, तसेच भक्तीने केलेले भगवंताचे कीर्तन (नाम) सर्व … Read more

साधनेत अधिक प्रगती केलेल्यांना ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असते.

‘आपत्काळात सर्वसाधारण व्यक्तीला कुटुंबियांची काळजी वाटते; पण तेव्हा साधनेत प्रगती केलेल्या साधकांना साधकांची, म्हणजे ईश्‍वराच्या कुटुंबाची, म्हणजे त्याच्या भक्तांची काळजी वाटते. साधनेत अधिक प्रगती केलेल्यांना ती काळजीही वाटत नाही; कारण ‘ईश्‍वर करतो, ते भल्यासाठी’ यावर त्यांची पूर्ण श्रद्धा असते.’

साधकांच्या दृष्टीने प्रगतीचे सर्वाधिक मूल्य !

‘अनेक राजे-महाराजांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे मूल्य सर्वाधिक वाटते; कारण मूठभर मावळ्यांनिशी पाच बलाढ्य परकीय पातशाह्यांशी केलेल्या संघर्षात ते विजयी ठरले. याप्रमाणेच साधनेतील अडथळ्यांविना होणाऱ्या आध्यात्मिक प्रगतीपेक्षा साधनेतील अडथळ्यांवर संघर्षपूर्वक मात केल्याने होणाऱ्या प्रगतीचे मूल्य सर्वाधिक आहे.’

साधनेची ओढ अंतर्मनातून यायला हवी

‘कोणावरही साधनेची सक्ती करता येत नाही. साधनेची ओढ अंतर्मनातून यायला हवी. त्यासाठी अध्यात्माचा आणि साधनेचा अभ्यास केल्यास साहाय्य होते.’

साधनेचे चैतन्य

आपण आपल्या व्यक्तीमत्त्वामुळे इतरांच्या लक्षात रहात नाही, तर साधनेच्या चैतन्यामुळे लक्षात रहातो !

‘‘आश्रमात कोण राहू शकतो ?’’

‘सनातनचा आश्रम पहायला येणारे काही जण विचारतात, ‘‘आश्रमात कोण राहू शकतो ?’’ या प्रश्‍नाचे उत्तर आहे, ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी अखंड साधना करू इच्छिणारे आश्रमात राहू शकतात.’

साधनेचे महत्त्व !

‘प्रकाशाची गती, ग्रह-तार्‍यांचे एकमेकांपासूनचे अंतर इत्यादी अनेक शोध हिंदूंच्या ऋषिमुनींनी पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या सहस्रो वर्षे पूर्वीच लावले आहेत. पाश्‍चात्त्यांकडे असतात तशा अत्याधुनिक उपकरणांविना ऋषिमुनी हे शोध लावू शकले, ते त्यांच्या साधनेमुळे प्रगट झालेल्या अंतर्ज्ञानाच्या (ईश्‍वरी ज्ञानाच्या) बळावर ! आजच्या विज्ञानयुगातील पिढीने याचा अंतर्मुखतेने विचार करून साधना केली, तर तिला लौकिक जीवनातील यशप्राप्ती होण्यास साहाय्य होऊन पारमार्थिक … Read more