संतांप्रती भाव असण्याचे महत्त्व !

‘आपण संतांच्या केवळ चरणांना स्पर्श करून भावपूर्ण नमस्कार करतो. तेव्हा त्यांच्या चरणांमधून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याने आपल्याला लाभ होतो. याउलट मर्दन करणारे संतांचे संपूर्ण अंग रगडतात; पण त्यांच्यात संतांप्रती भाव नसल्याने त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१०.२०२१)

पोलिसांनो, निर्दाेष व्यक्तीला त्रास दिल्याचे पाप लागू नये, म्हणून प्रतिदिन अधिकाधिक साधना करा !

‘पोलिसांचा प्रतिदिन गुन्ह्यांशी संबंधित अनेक संशयितांशी संपर्क येतो. या संशयितांकडून गुन्ह्याच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी प्रसंगी कठोर होऊन त्यांना मानसिक आणि शारीरिक दंडही द्यावा लागतो. हा त्यांच्या कार्यशैलीचा एक भाग असतो. चौकशीअंती एखादी संशयित व्यक्ती निर्दाेष असल्याचेही लक्षात येते; पण कर्मफलन्यायानुसार पोलिसांना त्या निर्दाेष व्यक्तीला दिलेल्या दंडाचे पाप लागते अन् त्या व्यक्तीबरोबर केलेल्या गैरवर्तणुकीमुळे … Read more

व्यवहार आणि अध्यात्म

‘व्यवहारामध्ये ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये’, असे सांगितले जाते; परंतु अध्यात्मात साधनेसाठीच्या प्रयत्नांचा जितक्या प्रमाणात अतिरेक करू, त्याचा अधिकाधिक लाभच होत जातो आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१२.२०२१)

संतांचे चैतन्य !

‘संतांच्या चैतन्यामुळे त्यांच्या संपर्कातील निर्जीव वस्तूतही सकारात्मक पालट होतो, तर त्यांच्या शिष्यांमध्ये होणार नाही का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१२.२०२१)

ध्यानाचे लाभ आणि तोटे

ध्यानामुळे व्यष्टी साधना होते; पण समष्टी साधना होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)

अध्यात्मशास्त्र आणि विज्ञान यांमधील भेद !

‘सच्चिदानंद ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे अध्यात्मशास्त्र सांगते, तर ‘ईश्वर नाहीच’, असे काही विज्ञानवादी, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी ओरडून सांगतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्ताला अहंभाव नसणे

‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)

धार्मिक ग्रंथांचे नुसते वाचन किंवा पठण न करता त्यात शिकविलेली साधना कृतीत आणा !

‘विविध धार्मिक ग्रंथांचे कित्येक वर्षे काही लाख वेळा पठण केलेल्यांची साधनेत विशेष प्रगती झालेली आढळून येत नाही. याचे कारण हे की, ते नुसतेच पठण करतात. त्यात शिकवलेली साधना कृतीत आणत नाहीत. साधना करण्याची खरोखरीची इच्छा असणाऱ्यांनी ‘स्वत:कडून ही चूक होत नाही ना ?’, इकडे लक्ष द्यावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.३.२०२२)

साधकांना मायेच्या गोत्यात गुंतवणारे नातेवाईक !

‘साधना करणारा एखादा युवक त्याच्या जीवनाचे ‘साधना करणे’, हे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने मायेतील सर्व गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे नातेवाइक जगरहाटी म्हणून ‘लग्न कर’ यासाठी त्याच्या पाठी लागतात. त्याचे लग्न लावून दिल्यावर नातेवाइक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते त्याला साधनेसाठी किंवा संसारासाठी साहाय्य करत नाहीत. त्यामुळे तो युवक संसाराच्या अडीअडचणींमुळे साधनेपासून दूर … Read more

साधना करण्याचे महत्त्व

जे आयुष्यभर राबून अशाश्वत अशा विज्ञानाने मिळत नाही, ते साधनेत सेवा करून क्षणात मिळू शकते. हाच साधनेतील आनंद आहे. – श्रीचित्‌शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ, कुंभकोणम, तमिळनाडू. (२२.१०.२०१९)