दया

अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन हे दयाळू म्हणून प्रसिद्ध होते. एकदा मित्रासमवेत घोडागाडीतून जात असतांना मित्र त्यांच्यावर थोर असूनही केवढा दयाळू इत्यादी स्तुतीसुमने उधळीत होता. लिंकन मित्राला सांगत होते, “बाबा रे, मी सत्यच सांगतो की, मी काही दयाळू नाही”. जाता जाता एक घोडा तारेच्या कुंपणात अडकून रक्तबंबाळ झालेला दिसला. लगेच लिंकन गाडीतून उतरले आणि त्यांनी घोड्यास सोडवून त्याच्या जखमा धुतल्या अन् त्याच्यावर पट्टी बांधून ते गाडीत बसले. मित्राने विचारले, “पहा, हे दयाळूपणाचे प्रात्यक्षिक नाही तर काय ?” लिंकन म्हणाले, “बाबा रे, मी घोड्यावर दया केली नाही. जर मी त्याला सोडवले नसते, तर मला रात्री झोप आली नसती. मला सुखाने झोप लागावी; म्हणून मी त्या घोड्यास सोडवले.” लिंकन केवळ दयावान होते असे नव्हे, तर नम्रतेचाही पुतळा होते.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८०)

Leave a Comment