कोणता जयघोष कधी करावा ?
१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)
१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)
एकुलता एक मुलगा असला की, वडिलांची सर्व संपत्ती मिळते; पण भावंडांबरोबर कसे रहायचे ? भावंडांचे प्रेम म्हणजे काय ?, हे शिकायला मिळत नाही. पुढे आई-वडिलांचे सर्व उत्तरदायित्वही सांभाळावे लागते. ते नको असल्याने हल्लीची मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. साधना केल्यास मुले कृतज्ञतापूर्वक आई-वडिलांचे शेवटपर्यंत सर्व करतात आणि त्यांच्या मुलांसमोरही एक आदर्श ठेवतात. – डॉ. आठवले … Read more
गेले ४ – ५ महिने मी तोंडाला अतिशय कोरड पडते, या त्रासासाठी डॉक्टर आणि वैद्य यांचे उपाय केले. तेव्हा लिमलेटच्या गोळ्या चघळायचो; पण फरक पडला नाही. कोरड पडते तेव्हा पाणी प्यायला हवे, हे लक्षात यायचे नाही. काल ते लक्षात आले आणि पाणी अधिक प्रमाणात प्यायला लागलो. तेव्हापासून तोंडाला कोरड पडणे कमी झाले. – डॉ. आठवले … Read more
विज्ञानाने शोधून काढलेल्या यंत्रांमुळे दैनंदिन कार्य, प्रवास इत्यादींसाठी लागणारा बराच वेळ वाचला; मात्र त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे व्यसने, स्वैराचार इत्यादी गोष्टींत मानव वेळ घालवू लागला. त्यामुळे त्याची अधोगती अती वेगाने झाली आणि होत आहे. – डॉ. आठवले (१९.१.२०१४)
पहाणे हे तेजतत्त्वाच्या स्तरावरील असते, तर ऐकणे हे आकाशतत्त्वाच्या स्तरावरील असते. त्यामुळे पहाण्यापेक्षा ऐकण्यात अधिक आनंद असतो. एखादी कलाकृती किंवा व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी तिच्याकडे अधिक काळ पहाता येत नाही. त्याचे आणखीन एक कारण म्हणजे तेथे विषय एकच रहातो. याउलट आकाशतत्त्वाच्या स्तरावर विविध विषयांवर बोलता येते; म्हणूनच चित्रे किंवा मूक चित्रपट यांच्यापेक्षा आकाशवाणी अधिक … Read more
बुद्धीप्रामाण्यवादी आयुष्यभर बुद्धीने मायेतील स्थूल गोष्टींचा शोध घेत रहातात, तरी त्यांना त्यासंदर्भात अतिशय अत्यल्प आणि तेही फक्त वर्तमान स्थितीतील कळते. त्यांना स्थूल गोष्टींतील चिरंतन तत्त्व कळत नाही. याचे कारण हे की, साधना नसल्यामुळे त्यांना विश्वबुद्धीचे साहाय्य होत नाही. त्यामुळे त्यांचे विचार आणि संशोधनही ५० – ६० वर्षांनी कोणाला ज्ञात नसते. याउलट अनादी वेद विश्वबुद्धीतून ग्रहण … Read more
शहरात रहाणारे लोक मायेच्या आधीन जीवन जगत असतात. बहुतेकजण या मायेच्या चक्रामध्ये देवाला विसरलेले असतात. अनेक सुखसुविधांमुळे त्यांच्या शरिराला कष्ट करायची सवय रहात नाही. तसेच प्रलोभने आणि स्वार्थ यांमुळे त्यांची वृत्ती संकुचित आणि प्रेमभाव नसलेली बनते. त्यामुळे त्यांच्या मनातील निर्मळता आणि आनंद लोप पावलेला असतो आणि त्यांचे मन तणावानेच ग्रस्त असते. तसेच शरिराला कष्टाची सवय … Read more
व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी ती आरशात स्वतःकडे फारच थोडा वेळ पहाते. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. अतिपरिचयात् अवज्ञा ।, म्हणजे (आरशात पहाणे) नेहमीचेच झाल्याने त्याचे काही अप्रूप वाटत नाही. २. बहुतेक सर्वच जण बहिर्मुख असल्यामुळे स्वतःकडे पहाण्यापेक्षा त्यांना इतरांकडे पहाणे जास्त आवडते. – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (१३.७.२०१३))
मराठी भाषेचे लेखन सुलभ होण्याच्या दृष्टीने तिच्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मराठी भाषा कशी लिहावी, याविषयी १४ नियम सिद्ध केले. सुलभीकरणाच्या या प्रयत्नात महामंडळाने संस्कृतोद्भव मराठी भाषेच्या व्याकरणात संस्कृत व्याकरणाच्या विरुद्ध जातील, असे पालट केले, उदा. मूळ इकारान्त शब्द ईकारान्त केले, म्हणजे गणपतिचे गणपती केले. असे करणे म्हणजे वैद्यकीय शिक्षण कठीण वाटणार्यांसाठी … Read more
देवळांतील पुजारी तेथील मूर्तीच्या सहवासात वर्षानुवर्षे सातत्याने असल्यामुळे बहुतेकांच्यात यांत्रिकपणा येतो. अतिपरिचयात् अवज्ञा । म्हणजे अतिपरिचयामुळे अनादर होतो या सिद्धांतानुसार त्यांच्याकडून मूर्तीच्या संदर्भात असे होते. याउलट देवळात दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांचा क्षणभरच्या दर्शनानेही भाव जागृत होतो. पुजारी असल्याचा स्वतःला लाभ व्हावा; म्हणून त्यांंनी आई-वडिलांची सेवा वर्षानुवर्षे यांत्रिकपणे न करणार्या श्रावणाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. श्रावण … Read more