भगवत्कथा ऐकण्यास जाण्याचे लाभ

१. कर्मयोग : कथेसाठी जाणे आणि येणे

२. भक्तीयोग : श्रद्धा वाढणे

३. ज्ञानयोग : कथेचा सारांश समजणे

प्रवचनाचे वैशिष्ट्य : प्रवचनकार श्रम करतो आणि फळ श्रोत्यांना मिळते !

पुढच्या जन्मी देवाण-घेवाण फिटण्याचे उदाहरण एक मुलगा मूठ मूठ माती घेऊन एका सापावर टाकत होता. सापाने फणा खाली घातला. तितक्यात दुसऱ्या एका माणसाने सापाला मोठा दगड मारला. त्यामुळे साप मृतवत् झाला; परंतु तो थोड्या वेळाने शुद्धीवर आला आणि दगड मारणाऱ्याला चावला. तेव्हा तो माणूस मेला. लोकांनी सापाला विचारले ‘तू मुलाला का चावला नाहीस ?’ साप म्हणाला, ‘मागच्या जन्मी मुलगा वाणी होता. मी त्याचे ३०० रुपये कर्ज दिले नव्हते. माझा स्वभाव द्वेषयुक्त असल्याने या जन्मी साप झालो. द्वेषामुळे मी दगड मारणाऱ्यास चावलो. या माणसाने वाण्याच्या मुलाला ५०० रुपये दिले, तर मी त्याचे विष शोषून घेईन’.

सुखापेक्षा दुःख महत्त्वाचे

सुखामुळे दुःख मिटते आणि दुःखामुळे आसक्ती मिटते. भक्ती आणि ज्ञान मानणे म्हणजे भक्ती आणि जाणणे म्हणजे ज्ञान.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment