देव मिळाल्यावर काही मिळवण्याची आशा-आकांक्षा रहात नाही

आयुष्याच्या या साधना प्रवासात जेथे देव मिळतो, तेथे अजून काही मिळवण्याची आशा-आकांक्षा रहात नाही. देवाचे विश्व पुष्कळ सुंदर आणि अद्भुत् आहे. त्यात रमले की, कशाचीच आठवण येत नाही. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

मनुष्यजन्माचा उद्देश !

मनुष्यजन्म हा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून जिवाची मुक्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे जे काही भोग शेष राहिले असतील, तेही भोगून संपवावेत. देव जिवाला साधना करून मोक्षप्राप्ती करवून घेण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर मनुष्यजन्म देतो; पण मनुष्य हे विसरतो आणि मायेच्या मागे लागून संपूर्ण जीवन व्यर्थ घालवतो.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

व्यवहारातील माणसाचा अहं आणि साधकाचा भाव

‘व्यवहारात माणसाला अहं असतो, ‘माझे आणि माझ्या घरच्यांचे जीवन मी चालवत आहे. मी नसलो, तर माझ्या मागे माझ्या बायका-पोरांचे, नातलगांचे काय होईल ?’ काही कारणामुळे त्या व्यक्तीचे निधन होते. त्या वेळी देव दाखवून देतो, ‘तो मनुष्य नसतांनाही त्याचे घर चालले आहे. त्याचे कुटुंबीय जीवन जगत आहेत.’ मायेमध्ये जगतांना हे जगणे कठीण असते; कारण ‘मी सर्व … Read more

देवाचे भक्त होण्याचे महत्त्व !

‘आपण देवाचे भक्त बनलो की, देव आपत्काळातही आपल्या तोंडात सोन्याचा चमचा ठेवतो, म्हणजेच तो आपल्याला आपत्काळाची झळ लागू देत नाही !’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधनेचे चैतन्य

आपण आपल्या व्यक्तीमत्त्वामुळे इतरांच्या लक्षात रहात नाही, तर साधनेच्या चैतन्यामुळे लक्षात रहातो !

एका कुटुंबातील एक व्यक्ती जरी साधनेत असेल, तरी तो साधक आणि त्याचे कुटुंब यांची मोठी पुण्याई असतेे !

‘कलियुगात साधना करणार्‍या व्यक्ती सापडणे कठीण आहे आणि साधना करणारे साधक भेटणे त्याहूनही कठीण आहे. एखाद्या कुटुंबातील एक साधक साधनेत असेल, तरी तो साधक आणि त्याचे कुटुंब यांची केवढी मोठी पुण्याई आहे. त्या पुण्याईला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्यासाठी आपल्याला त्या साधकांना भेटावे लागते.’

साधकांनो, जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते आणि आपण मनाला सतत देवाला धरून रहायला शिकवले, तर त्यातून आपली साधना होते !

‘माझ्याकडे कुणी लक्ष देत नाही’, असा विचार करायला नको. आपण जे काही करतो, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद देवाकडे होत असते. आपल्याला असे वाटणे; म्हणजे आपल्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. आपल्या संदर्भात जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते. देव कधीच चुकीचे करणार नाही. ‘देव आणि मी’, याकडेच आपण लक्ष द्यायचे. ‘कोण कसे वागते ?’, याकडे लक्ष … Read more