चूक सांगण्यातूनही साधना व्हायला हवी

इतरांना चूक सांगतांना त्यांना पूर्णतः समजून घेऊन त्यांचे कल्याण होण्याच्या भावनेतूनच ती सांगायला हवी, तरच चूक सांगतांनाही आपल्या वाणीत आईच्या वाणीसारखे मार्दव येते. ‘चूक सांगण्यातूनही साधना व्हायला हवी’, तरच समष्टीचा तोल बिघडत नाही. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

खरे सौंदर्य

आहारात सात्त्विकता असायला हवी. जसा आहार, तसा विचार, तसे देहाचे सौंदर्य ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

प्रभु श्रीरामाने खारीचा उद्धार करणे

रामसेतूसाठी साहाय्य करणार्‍या खारीच्या पाठीवर श्रीरामाने त्याची तीन बोटे उमटवली. यातून त्याने खारीचा उद्धार केला, म्हणजेच प्रभु श्रीरामाने खारीचे मन, बुद्धी आणि अहं नष्ट केले. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

देह निर्गुणाकडे जाण्याचे महत्त्व

८५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे संतांचा देह निर्गुणाकडे जाऊ लागतो. त्यामुळे त्यांच्या देहातून सर्व बाजूंनी चैतन्याचे प्रक्षेपण चालू होते, म्हणजेच दशदिशा व्यापून कार्य होऊ लागते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

आनंदाशी एकरूप होण्यातील आनंद

‘इतरांच्या आनंदात आपण सहभागी व्हायला हवे. आपल्या इच्छा इतरांवर लादण्यापेक्षा इतरांच्या इच्छेप्रमाणे वागणे आणि त्यांच्या आनंदाशी एकरूप होण्यातील आनंद काही वेगळाच आहे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

प्रार्थना म्हणजे देवाची आठवण

प्रत्येक गोष्टीचा प्रार्थना करून लाभ करून घेता आला पाहिजे. प्रार्थना म्हणजे देवाची आठवण. प्रार्थना ‘मी’पण विसरायला लावते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

देव जीवनात उतरला, तरच प्रगती होते

‘अध्यात्म’ हे प्रायोगिक शास्त्र आहे. केवळ वाचून देव मिळवता येत नाही. कित्येक जण केवळ पोथीची पारायणे करतात; परंतु ‘पोथीत संतांनी सांगितलेल्या सुवचनानुसार आपण प्रत्यक्ष जीवनात वागत आहोत ना ?’, याचा कुणीच विचार करत नाही. संतांच्या विचाराप्रमाणे देव जीवनात उतरवावा लागतो, तरच प्रगती होते. नाहीतर अनेक वर्षे पोथीवाचन करूनही प्रगती होत नाही. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली … Read more

काळाचे गणित सर्वस्वी निराळे असल्याने बुद्धीने काळाला तपासून पहाण्याचा प्रयत्न न करता केवळ गुर्वाज्ञापालन करावे

‘काळाला अनुसरून काय करायचे ?’, हे केवळ गुरूंनाच ज्ञात असते; म्हणून आपण केवळ गुर्वाज्ञापालन करावे. बुद्धीने काळाला तपासून पहाण्याचा प्रयत्न करू नये; कारण काळाचे गणित सर्वस्वी निराळे असते. ते भल्याभल्यांना आपल्या प्रवाहात ओढून घेते. विचित्र काळगतीच्या प्रवाहातून गुरुच आपल्याला वाचवतात आणि आपल्याला गुरुगतीत सामावून घेतात, म्हणजेच त्यांच्या सत्संगात ठेवतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ