महाराष्ट्र म्हणजे हिंदुस्थानचा खड्गहस्त

हिंदुस्थान सोडून बाकीच्या सर्व लघुराष्ट्रांना आपल्या हिंदु धर्म जीवनाची, शिकवण देण्याचे दायित्व आपल्या महाराष्ट्र्राचे आहे बरं कां ! म्हणून तर आपले राष्ट्र महान आहे. ३०० वर्षांपूर्वीच ही जाणीव समर्थांनी त्यांच्या ‘दासबोध’ नामक ग्रंथात देऊन ठेवली आहे. ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।’ ‘मराठा’ म्हणजे क्षात्रवृत्ती होय. मराठा हा शब्द जातिवाचक नसून भाववाचक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वचन आपणाला आठवत असेलच – ‘हे भारतमाते, सर्व हिंदुस्थान झोपला असला तरी दुःख करू नकोस. एक महाराष्ट्र जागा होऊन तुझ्या पारतंत्र्यशृंखला तोडून तुला मुक्त केल्याशिवाय रहाणार नाही’. म्हणून महाराष्ट्र म्हणजे हिंदुस्थानचा खड्गहस्त आहे.

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

Leave a Comment