स्वतंत्र आणि स्वातंत्र्य

 भारताला ‘स्वातंत्र्य’ मिळाले, म्हणजे नेमके काय झाले ? बाह्यतः परकियांची राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली, इतकेच स्वातंत्र्य मिळाले, याचा अर्थ जाणवतो. ‘स्वम् आत्मानं शास्ति सः स्वतन्त्रः ।’, म्हणजे ‘जो स्वत़ःचे, स्वतःच्या आशा-आकांक्षा, भाव-भावना, विकार आणि विचार इत्यादींचे नियमन करतो, तो स्वतंत्र’. येथे आत्मा याचा लौकिक अर्थ अपेक्षित आहे, अध्यात्माचा संबंध नाही. त्याचा भाव आणि अस्तित्व म्हणजे स्वातंत्र्य.

  भारत स्वतंत्र झाला; पण त्याचे नागरिक मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत, ते आपली अस्मिता गमावून बसले आहेत. भाषा, आहार-विहार, वेशभूषा, करमणूक आणि करमणुकीची साधने, विचार, उच्चार या सर्व बाबतींत भारतीयत्व कोठेच जाणवत नाही. भारतातील प्रत्येक व्यक्ती वरील सर्व बाबतींत पराधीन, परशासित आणि परावलंबी आहे. अशा या स्वतंत्रतेला कोपरापासून नमस्कार !

(संदर्भ : सद्धर्म त्रैमासिक, ऑक्टोबर १९९६)

Leave a Comment