भारताचेच उदाहरण पाहिल्यास पूर्वी हिंदुस्थान या संकल्पनेत पाकिस्तान, आताचा भारत, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, पूर्व बंगाल, जावा, सुमात्रा, तिबेट, बलुचिस्तान, नेपाळ, भूतान, अक्साई आणि चीन एवढा मोठा भूभाग समाविष्ट होता. त्याचे लचके तोडत प्रचलित भारत राष्ट्र म्हणून उभा आहे. राष्ट्राची मर्यादा काळाच्या ओघात वृद्धी वा क्षय पावू शकते. त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना पालटणारी आणि परिवर्तनीय आहे; परंतु आध्यात्मिक सत्ता, आध्यात्मिक सार्वत्रिक अस्तित्व सनातन आहे. पूर्वी होते, आता आहे अन् पुढेही असणार आहे. त्यात क्षय-वृद्धीचे पालट असंभव आहेत. ते नित्य आणि सनातन आहे. अशा चिरंतन आध्यात्मिक साधनेचा पायाभूत अभ्यास स्वयंसेवकांना दिला गेला असता, तर निःस्वार्थी राष्ट्रकार्याला निश्चितच यश लाभले असते.
– गवामयी सत्री प.पू. नाना काळेगुरुजी, श्री योगिराज वेद विज्ञान आश्रम, कासारवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर.
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?