प्रार्थना म्हणजे देवाची आठवण

प्रत्येक गोष्टीचा प्रार्थना करून लाभ करून घेता आला पाहिजे. प्रार्थना म्हणजे देवाची आठवण. प्रार्थना ‘मी’पण विसरायला लावते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

देव जीवनात उतरला, तरच प्रगती होते

‘अध्यात्म’ हे प्रायोगिक शास्त्र आहे. केवळ वाचून देव मिळवता येत नाही. कित्येक जण केवळ पोथीची पारायणे करतात; परंतु ‘पोथीत संतांनी सांगितलेल्या सुवचनानुसार आपण प्रत्यक्ष जीवनात वागत आहोत ना ?’, याचा कुणीच विचार करत नाही. संतांच्या विचाराप्रमाणे देव जीवनात उतरवावा लागतो, तरच प्रगती होते. नाहीतर अनेक वर्षे पोथीवाचन करूनही प्रगती होत नाही. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली … Read more

काळाचे गणित सर्वस्वी निराळे असल्याने बुद्धीने काळाला तपासून पहाण्याचा प्रयत्न न करता केवळ गुर्वाज्ञापालन करावे

‘काळाला अनुसरून काय करायचे ?’, हे केवळ गुरूंनाच ज्ञात असते; म्हणून आपण केवळ गुर्वाज्ञापालन करावे. बुद्धीने काळाला तपासून पहाण्याचा प्रयत्न करू नये; कारण काळाचे गणित सर्वस्वी निराळे असते. ते भल्याभल्यांना आपल्या प्रवाहात ओढून घेते. विचित्र काळगतीच्या प्रवाहातून गुरुच आपल्याला वाचवतात आणि आपल्याला गुरुगतीत सामावून घेतात, म्हणजेच त्यांच्या सत्संगात ठेवतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

भाव देवाकडे नेतो

‘आपला भाव आणि भावना यांवरच ‘आपला आजचा दिवस कसा व्यतीत होणार ?’, हे अवलंबून असते; म्हणूनच अखंड देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा. भावना तुम्हाला मायेत ओढतात, तर भाव देवाच्या जवळ नेतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

सेवेतून आपोआप आत्मज्ञान होणे

‘सेवेतून आपोआपच आत्मज्ञान होते; कारण सेवेमुळे अंतर्यामी गुरुतत्त्व जागृत होते. हे गुरुतत्त्वच साधकाचा सर्व कार्यभार उचलते. एकदा का अंतर्यामी गुरु जागृत झाले की, पोथ्यांची वेगळी पारायणे करावी लागत नाहीत’. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

व्यवहारापेक्षा परमार्थ सोपा !

‘व्यवहारामध्ये संपत्ती आणि मानसन्मान मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. याउलट साधना करतांना स्वतःचे तन, मन आणि धन हे केवळ अर्पण करायचे असते. काही तरी मिळवण्यापेक्षा देणे सोपे असते. त्यामुळे व्यवहारापेक्षा परमार्थ हा सोपा असतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ अध्यात्माचा अभ्यास करण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करा !

‘अध्यात्म’ म्हणजे आत्म्याचे स्वरूप सांगणारे शास्त्र ! हे शास्त्र अनादी अनंत आहे. त्यामुळे त्याचा कितीही अभ्यास केला, तरी तो कमीच असतो. प्रत्यक्षात हे केवळ शब्दजन्य ज्ञान असल्यामुळे त्यातून केवळ आत्मा, ईश्वर, त्याचे कार्य करण्याची पद्धत यांसारख्या विषयांची तात्त्विक माहिती मिळते. त्याचा मूळ ईश्वरप्राप्तीसाठी खूप लाभ होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष साधना करणेच आवश्यक असते.’ – सच्चिदानंद … Read more

झाड बहरण्यासाठी मुळांना पाणी घालतो, तसे व्यक्तीमत्त्व सुधारण्यासाठी अंतर्मनाला सूचना द्या !

‘जसे आपण झाडाची पाने चांगली दिसतात; म्हणून त्यांना पाणी न घालता, झाडाच्या मुळांनाच पाणी घालतो. त्याचप्रकारे स्वतःच्या व्यक्तीमत्त्वामध्ये पालट करण्यासाठी केवळ बाह्यमन आणि बुद्धी यांना न सांगता अंतर्मनाला सूचना देणे आवश्यक असते. अंतर्मनाला सूचना देण्याची पद्धत सनातन सांगत असलेल्या ‘स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिये’त शिकवली जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी अहंनिर्मूलनासाठी भक्तीयोग अधिक साहाय्यक !

‘साधना करतांना अहंनिर्मूलन होणे आवश्यक असते; पण ज्ञानयोग, कर्मयोग आणि हठयोग या मार्गांनी साधना करतांना अहंनिर्मूलन करणे, फार थोड्या जणांना जमते. त्या तुलनेत भक्तीयोगानुसार साधना करतांना अहंनिर्मूलन लवकर आणि सहजतेने होते. आजवर अनेक ज्ञानयोगी संत होऊन गेले; परंतु त्यांनीही कोणत्या तरी देवतेची अथवा त्यांच्या गुरूंची भक्ती केली. त्यामुळे अन्य साधनामार्गांनी साधना करणार्‍यांनी समवेत भक्तीयोगानुसारही काही … Read more

साधनेला आरंभ करतांना आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?

‘साधनेला आरंभ केल्यावर काहीजण उत्सुकतेपोटी आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करू लागतात. त्यांनी लक्षात घ्यायला हवे की, साधनेला दिशा मिळेल, प्रोत्साहन मिळेल असे ग्रंथ वाचावे. त्याच प्रमाणे हे ग्रंथ केवळ वाचण्यासाठी न वाचता त्यांचा अभ्यास करावा आणि त्यानुसार साधनेला आरंभ करावा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले