गुरुकृपायोगाद्वारे साधना करून स्वतःमध्ये पालट घडवून आणा आणि गुरुकृपेने येणार्‍या कोणत्याही कठीण परिस्थितीला सामर्थ्याने सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांसाठी प.पू. पांडे महाराज यांचा संदेश ! दैनिक सनातन प्रभातच्या आदरणीय वाचकांना, सप्रेम नमस्कार. मानवाच्या हातून भूतकाळात घडलेल्या वाईट कर्मांचा परिणाम, म्हणजे आजची भयानक वर्तमान स्थिती आहे, जी आपण प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातमधून वाचत आहोत. भारतीय संस्कृती आणि संत-महात्मे यांनी मानवाला भौतिक अन् पारमार्थिक दृष्टीने समर्थ होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे … Read more

इंग्रजी शिक्षण आणि आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींचा प्रभाव यांमुळेच भारतात हुंडाबळीच्या घटनांत वाढ होणे

सती आणि हुंडाबळी यांचा संबंध काय ? सतीची घटना १०० वर्षांत एखादीच घडते आणि हुंडाबळी हे प्रकरण इंग्रजी राज्य आणि इंग्रजी शिक्षण आल्यानंतर चालू झाले. इंग्रजी शिक्षणाने निर्माण केलेल्या आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींच्या चैनी, ऐषारामी जीवनाची ओढ, व्यक्तीस्वातंत्र्य, सनातन हिंदु धर्म परंपरा-रुढी-रिवाज यांकडे तुच्छतेने पहाण्याची वृत्ती, मुलींचे वाढते वय (म्हणजे २८ ते ३२ वर्षे किंवा त्यापेक्षा … Read more

‘ख्रिश्चन धर्मात हिंदु धर्मातून ‘अपराध स्वीकारणे’ आणि ‘प्रायश्चित्त’ घेतले आहेत

‘ख्रिश्‍चन धर्मात आमच्या हिंदु धर्मातून ‘अपराध स्वीकारणे’ (कन्फेशन) आणि ‘प्रायश्‍चित्त’ (रिपेंटन्स) घेतले आहेत. ख्रिश्‍चनांच्या ‘अपराध स्वीकारणे’ यामध्ये केवळ मानसिक स्तरावरची शुद्धीच अभिप्रेत आहे. वैदिक धर्मात मानसिक पापनिष्कृती तर आहेच, तसेच व्रताचरणादी काही शास्त्रीय कर्मे आचरावी लागतात.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (ग्रंथ ‘दिव्यत्वाची शिखरे’, प्रथमावृत्ती : वर्ष २०१०)

चैतन्य रूपात कार्य करणारी प्रभूशक्ती

‘आपल्या भारतामध्ये नदी, पर्वत, भूमी असे जे वातावरण आहे, ते सात्त्विकतेने, अध्यात्माने प्रभावित आहे, चैतन्याने युक्त आहे. त्याला नाहिसे करण्याचे आपणच ठरवलेले आहे, म्हणजे स्वतःचा आत्मघात करत आहोत. आपल्या देशातील नद्या या केवळ नद्या नाहीत. नदी म्हणजे चैतन्यरूपात कार्य करणारी प्रभुशक्ती आहे. हिमालय केवळ पर्वत नाही, तर ती देवाची शक्ती आहे.’ – प.पू. परशराम पांडे, … Read more

स्वार्थांध राजकीय नेते

‘आपण आपल्यातच गुंग आहोत. जनता स्वतःतच गुंग आहे. बहुतांश आमदार-खासदार स्वार्थाने आंधळे झाले आहेत. त्यांना देशाचे काही पडले नाही. त्यांना केवळ खुुुर्ची हवी आहे. अशा नेत्यांना दिसेल, तेथे खडसावा. असे नेते स्वतःही मरतील आणि आपल्या सर्वांना घेऊन मरतील. अधर्माचरणामुळे सध्याच्या हिंदूंची स्थिती सहिष्णुतेच्या अतिरेकामुळे सर्वांत मूढतेची झाली आहे. त्यामुळे ते धर्मांधांच्या अतिक्रमणापुढे नमते घेत आहेत. … Read more

श्रीकृष्णाचे सारथ्य

कृष्णाने गीतेच्या ११ व्या अध्यायात सांगितलेले आहे. ‘हे पहा, युद्ध झालेलेच आहे. फळ मिळालेले आहे.’ आरंभीच त्याने इतिश्री सांगून टाकली, तरीपण युद्ध करतांना आलेल्या अडचणींना तोंड देण्यासाठी तो सारथी झाला. आपल्याला योगेश्‍वराचा (प.पू. डॉक्टरांचा) आधार आहे. त्यामुळे आपल्याला भिण्याचे कारण नाही. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र येणार आहे’, हे सांगूनच टाकले आहे, तरीपण येणार्‍या काळासाठी तोंड देण्याला … Read more

गोवंश हत्या रोखण्याचा प्रभावी उपाय !

‘पूर्वी गोरक्षकांवर अत्याचार होत नव्हते, तर आता गोरक्षकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आता हिंदू पेटून उठतील. गोहत्या बंदी कायदा असूनही गोतस्कर आणि गोहत्या करणारे यांना आता मुभा मिळत आहे. जेव्हा हिंदू जागृत होतील, म्हणजे गोवंश हत्या करण्यासाठी देणार नाहीत, तेव्हा गोतस्कर हे गोतस्करी करू शकणार नाहीत.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

कुंभमेळे का होतात ?

‘आपल्याकडे कुंभमेळे का होतात ? मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या पवित्र नदीच्या पाण्यात महिनाभर साधुसंतांचे चैतन्य उतरावे आणि सर्वांना त्या चैतन्याला लाभ व्हावा, हा कुंभमेळ्याचा हेतू आहे.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)

चैतन्याने भारित झालेली संघटनाच प्रभावी कार्य करू शकणे !

‘भुशाची संघटित शक्ती म्हणजे लाकूड ! रेतीचे कण संघटित होऊन दगड बनतो. ही जी संघटित करण्याची शक्ती आहे, ते चैतन्यच आहे. अशा चैतन्याने भारित झालेली संघटनाच प्रभावी कार्य करू शकते. केवळ निष्क्रीय लोकांची संघटना कुठल्या कामाची ?’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१६)

ईश्‍वरानुसंधान कसे साधावे ?

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन १. साधक : ‘साधक कसा पाहिजे ? जागृत, तत्पर आणि संवेदनशील ! २. यज्ञकर्म : कर्म करतांना त्यात भाव ओतला म्हणजे ते यज्ञकर्म होते. समजून घेऊन भावपूर्ण केलेले कर्म म्हणजे यज्ञकर्म ! त्यातून साधना होते. ३. साधना : मन, इंद्रीय आणि कर्म यांची योग्य सांगड घालून (ज्ञानपूर्ण आणि भावपूर्ण … Read more