मोहक विषवेली एक दिवस सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय, असे भय निर्माण झाले असणे

सनातन हिंदु धर्म संस्कृतीच्या अत्यंत जुनाट सनातन वृक्षाला ही विषवेली बिलगली असून; ती इतकी वाढली आहे की, तो वृक्षच आता दिसेनासा झाला आहे. ती मोहक विषवेली आता एक दिवस तो सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय ?, असे भय निर्माण झाले आहे. हिंदु जीवन ही चीज हिंदूनाच दुर्मिळ झाली आहे. हिंदुत्वाची बात दूरची ! आणि … Read more

मक्सम्यूलरने हिंदु धर्माचे मूळ असलेल्या वेदांनाच उखडून टाकणे

ऋग्वेदाच्या अनुवादाविषयी मॅक्सम्यूलर हा पाश्‍चिमात्त्य विचारवंत आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, वेद हेच हिंदूंच्या धर्माचे मूळ आहे. … आणि तेच कसे हीन आहेत ?, हे मी दाखवतो आहे. माझी खात्री आहे की, तीन सहस्त्र वर्षांपासून जे जे या वेदापासून मोहरले आहे, त्या सर्वांचे मूळच मी उखडून टाकले आहे.

हिंदुस्थानातच राहिलेला हिंदु अंतःकरणाने मात्र गोरा साहेब झालेला असणे

आज भारतियांच्या घराघरातील तेजस्वी शिक्षणाचे, संस्काराचे निर्मळ निर्झर आटून कोरडे ठणठणीत झाले आहेत. हिंदुस्थानात, हिंदु घराण्यात, हिंदु म्हणून जन्मला, हिंदु म्हणून वाढला, हिंदुस्थानातच राहिला असला, तरी आज अंतःकरणाने तो हिंदु, गोरा साहेब झाला आहे.

सगुणाची पूजा करतांना आपल्यातील भगवंत प्रसन्न व्हायला हवा !

सगुणाची पूजा, म्हणजे आपल्यातील निर्गुण ईश्‍वराला सगुणात आणून त्याची पूजा करत आहोत, असा भाव ठेवला, तर ती पूजा आत्मीयतेने होऊन आपल्यातील भगवंत प्रसन्न होतो.

मायेतील ब्रह्माविषयी कृतज्ञ असणे आवश्यक !

आपण मायेतील ब्रह्माला जवळ करत नाही, तर मायेशी संवाद साधतो. आपण मायेच्या मूळ रूपाला जाणत नाही, उदा. आश्रमातील जांभळे खातांना ती ज्याच्यामुळे मिळाली त्याची जाणीव आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. ज्या झाडाने जांभळे दिली त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, तर झाड आणि जांभळे काढून देणारा हे दोघेही प्रसन्न होतील.

कार्य सत्य नसून कार्याचा कर्ता करविता ईश्‍वरच खरा सत्य होय !

कार्याचे व्यक्त स्वरूप आपल्यात दृष्यमान होत असते. त्यालाच आपण सत्य समजण्याची चूक करतो. प्रत्यक्षात कार्याचा कर्ता करविता (मन आणि ईश्‍वर) अव्यक्त असून तोच खरा सत्य असतो. अशा प्रकारे असत्याला सत्य मानल्याने सूक्ष्मातील ईश्‍वराशी आपले अनुसंधान रहात नाही. वास्तविक अव्यक्तच श्रेष्ठ असते.

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये भाव आणि कुटुंबभावना वाढीस लागणे

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ध्येय ठेवून गेली ५ वर्षे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. प्रतिवर्षी भारतातील अनेक राज्यांसह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, या देशांमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होत आहेत. याचा झालेला लाभ म्हणजे या अधिवेशनांमुळे सर्व हिंदुत्वनिष्ठांमधील संघटितपणा टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन आता एकमेकांविषयी कुटुंबभावना निर्माण झाली आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र … Read more

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे अभेद्य संघटन उभे करत असणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परकीय आक्रमकांनी हिंदुस्थानवर आक्रमणे केली, तेव्हा काही अपवाद वगळता अन्य वेळी तत्कालीन हिंदु राजे, संस्थानिक, सरदार आदींमध्ये एकीचा अभाव दिसला. यामुळेच आक्रमकांना दीर्घकाळ हिंदुस्थानवर राज्य करता आले. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंचे अभेद्य संघटन निर्माण व्हायला हवे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्यस्थितीत हिंदु अधिवेशनांसारख्या माध्यमांतून हिंदूंचे अभेद्य संघटन करत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले … Read more

आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।

भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला … Read more