अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये भाव आणि कुटुंबभावना वाढीस लागणे

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ध्येय ठेवून गेली ५ वर्षे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. प्रतिवर्षी भारतातील अनेक राज्यांसह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, या देशांमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होत आहेत. याचा झालेला लाभ म्हणजे या अधिवेशनांमुळे सर्व हिंदुत्वनिष्ठांमधील संघटितपणा टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन आता एकमेकांविषयी कुटुंबभावना निर्माण झाली आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र झटणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी या हिंदुत्वनिष्ठांमध्ये दृढ विश्‍वास निर्माण झाला अन् या विश्‍वासाचे रूपांतर आता श्रद्धेमध्ये झाले आहे. ‘केवळ मानसिक स्तरावर कार्य न करता संघटितपणे आध्यात्मिक स्तरावर कार्य केल्यास हिंदु राष्ट्र लवकरात लवकर स्थापन होईल’, हा भाव आता सर्वांमध्ये निर्माण झाला आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment