सनातन संस्थेत साधकाला सर्वांगाने घडवले जाणे
इतर आध्यात्मिक संस्थांत केवळ देहाला घडवतात. सनातन संस्थेत साधकांचे मन आणि बुद्धी यांनाही घडवतात.
इतर आध्यात्मिक संस्थांत केवळ देहाला घडवतात. सनातन संस्थेत साधकांचे मन आणि बुद्धी यांनाही घडवतात.
समाजातील संत मानसन्मान आणि हेवेदावे यांत गुंतलेले असतात. याउलट प.पू. गुरुमाऊलीने सनातनच्या संतांना साधी राहणी आणि निष्काम भाव यांची शिकवण देऊन आत्मिक शक्ती दिली आहे. ती ते केव्हाही वापरू शकतात. गुणातीत शक्ती त्रिभुवनाला पुरेशी होते.’ आत्मानुसंधान ‘आत्म्याशी संबंध म्हणजे आत्मानुसंधान ! सूक्ष्मातून संधान साधणे, म्हणजे सर्व चैतन्यमय असल्याची अनुभूती घेणे.’
‘अध्यात्मशास्त्र अनंताचे शास्त्र आहे; म्हणून देवाशिवाय ते कोणी सांगू शकत नाही. हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्र देवांनीच सांगितलेले असल्यामुळे ते अनंत आहे.’
‘आपला मुलगा सात्त्विक व्हावा, ईश्वरप्राप्तीला लायक व्हावा’, असे पूर्वीच्या आई-वडिलांना वाटायचे. आता ‘आपला मुलगा शिक्षण घेऊन नोकरीला लायक व्हावा, विदेशात जावा’, असे आई-वडिलांना वाटते !’
‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७१ वर्षे अनुभवले आहे.’
‘विज्ञानाला अध्यात्म ज्ञात नसल्याने वैज्ञानिक अध्यात्मात संशोधन करत नाहीत.’
अध्यात्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत असल्यामुळे सनातन संस्थेमध्ये प्रत्येकाला त्याच्या आवश्यकतेनुसार साधना सांगितली जाते. वैद्य ज्याप्रमाणे प्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेनुसार उपचार सांगतात, त्याप्रमाणे हे आहे.’
‘एखादा रुग्ण मोठ्या आजारासाठी आधुनिक वैद्यांनी सांगितलेली औषधे घेत असला, तरी इतर आजार झाल्यावर तो इतर औषधेही घेतोच. तसेच गुरूंनी सांगितलेला जप त्यांचा शिष्य ईश्वरप्राप्तीसाठी करत असला, तरी जीवनात मोठ्या आध्यात्मिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी गुरूंना संपर्क होऊ शकत नसल्यास इतर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपायही करावेत.’
‘नामजप इत्यादी साधनेने प्रारब्ध बदलत नाहीत, तर ते भोगण्याचे सामर्थ्य मिळते.’
‘भारत सोडून इतर देशांतील पूर्वजांनी एकाही शोध लावलेला नाही. आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी जन्मापूर्वीचे आणि नंतरचे जीवन, अनेक युगे, सप्तलोक आणि सप्तपाताळ इत्यादी सर्वच विषयांवरील सर्व माहिती लिहून ठेवली आहे. एवढेच नव्हे, तर जन्म-मृत्यूंच्या फेर्यांतून मुक्त कसे व्हायचे, ईश्वरप्राप्ती कशी करायची, या सर्वांबद्दलचे ज्ञानही लिहून ठेवले आहे. आपल्याला फक्त अभ्यास करून ते समजून घ्यायचे आहे. भारताची … Read more