हिंदु धर्म

मधुमेह किंवा रक्तदाब असलेल्या रुग्णाला औषधे जितकी आवश्यक आहेत, तितकाचा मानवाला हिंदु धर्म आवश्यक आहे. त्याला विसरल्यामुळे हिंदूंची आणि मानवाची अवस्था मरणोन्मुख झाली आहे. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))

गुरुंकडून ज्ञान मिळवण्यापेक्षा त्यांची सेवा करणे जास्त महत्त्वाचे !

‘अध्यात्मात सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. शिष्य जेव्हा गुरूंकडून ज्ञान मिळवतो, तेव्हा तो त्याग करण्याऐवजी काहीतरी मिळवत असतो. याउलट सेवा करतांना तन व मन यांचा त्याग होतो; म्हणूनच जिज्ञासूपेक्षा सेवा करणारे शिष्य गुरूंना जास्त आवडतात.’ – डॉ. आठवले (२३.७.२००७, सायं. ६)

समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय एकच आणि तो म्हणजे प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे

आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय सांगता येत नाहीत. … Read more

‘अध्यात्मात ज्ञानयोगानुसार
‘चूक व बरोबर’ असे काही नसते.’

१. मानसिक स्तर: ‘बरोबर असले की आनंद होतो. चूक झाली असता, ती का झाली याचे शास्त्र कळले की तेव्हाही आनंद होतो. आनंद म्हणजे सत्य व सत्य म्हणजेच बरोबर. – सौ. अंजली गाडगीळ, रामनाथी आश्रम, गोवा. २. आध्यात्मिक स्तर : ज्ञानयोगानुसार सर्वत्र फक्त ब्रह्मच असल्याने त्यात ‘चूक व बरोबर’ असे काही नसते – डॉ. आठवले (८.७.२००७)

हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सनातन प्रयत्‍नशील !

‘हिंदू धर्मांतर करतात; कारण हिंदूंमध्ये धर्माभिमान नाही. हिंदूंना धर्माभिमान नाही; कारण हिंदूंना धर्मशिक्षण नाही. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सनातन प्रयत्‍नशील आहे. हिंदूंच्या दुःस्थितीच्या कारणाच्या मुळाशी जाऊन ते दूर करण्याचा प्रयत्‍न सनातन संस्था करते !’ – डॉ. आठवले (१६.३.२००७)

जिज्ञासेमुळे तळमळ निर्माण होऊन आत्मज्ञान प्राप्त होण्यास साहाय्य होणे

‘एखाद्या गोष्टीची जिज्ञासा असली, तरच ती जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्यातूनच तळमळ निर्माण होते. आत्मज्ञानासंदर्भात तळमळ असली, तरच साधकाकडून साधनेसाठी तीव्र प्रयत्न होतात आणि शेवटी त्याला आत्मज्ञान होते.’ – डॉ. आठवले (मार्गशीर्ष शुद्ध पक्ष ६, कलियुग वर्ष ५११४ (१८.१२.२०१२)

शिवसेनाप्रमुखांचे हिंदू राष्ट्र-स्थापनेचे विचार सत्यात आणून दाखवणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ! – प.पू. डॉ. जयंत आठवले, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान, ‘सनातन संस्था’

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्यासाठी जीवन वाहून घेण्याची समष्टी साधना करणारे महान कर्मयोगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ! ‘मी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ‘आंतरमहाविद्यालयीन मराठी वाङ्मय मंडळा’ची स्थापना केली. तेव्हा शिवसेनेची ‘विद्यार्थी सेना’ नुकतीच कार्यरत होत होती. तेव्हा कुमार कदम इत्यादी ‘विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांबरोबर माझी जवळीक झाली. तेव्हापासून शिवसेनेबद्दल माझ्या मनात जवळीक निर्माण झाली. ती किती … Read more

सासूके घरसे जवाई, बहनके घरसे भाई औरगुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते ।

भावार्थ : ‘गुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते’ म्हणजे शिष्यावर गुरुकृपा झाल्याशिवाय रहात नाहीत. एकदा एखाद्याला शिष्य केले की, त्याला पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी गुरु पार पाडतात. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज

सद्‍गुरुनाथा तू अपराधी । तुझेच अपराध घे पदरात ।।

भावार्थ : सद्‍गुरूंना शिष्याने एकदा सर्वस्व अर्पण केले की, शिष्याचे स्वतःचे असे काही उरत नाही; म्हणून अशा शिष्याच्या शरिराने किंवा मनाने काही चुका झाल्या, तर त्या एकप्रकारे गुरूंच्याच ठरतात ! गुरुच अपराधी ठरतात ! – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज