नामजपात वैखरी वाणीचा लाभ

आपण नेहमी बोलतो, त्या वाणीला वैखरी वाणी म्हणतात. साधनेत नामजप करतांना वैखरीतून मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणींत जप करत करत पुढे जायचे असते. हे साध्य करणे सुरुवातीला कठीण असते. तेव्हा वैखरी वाणीत जप करतांना जप ऐकू येत असल्यामुळे जपावर मन एकाग्र व्हायला साहाय्य होते. त्यामुळे पुढच्या वाणींतील जप करणे सुलभ होते. – डॉ. आठवले (२.३.२०१४)

Leave a Comment