हल्लीची हास्यास्पद शिक्षा पद्धत आणि सनातन संस्था सांगत असलेल्या साधना करण्याच्या शिक्षेचे महत्त्व

शिक्षा करण्याचा मूळ उद्देश असा असतो की, गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा करण्यास धजावू नये. हल्लीच्या शिक्षा पद्धतीत हे अजिबात साध्य होत नाही. पुनः पुन्हा तेच तेच गुन्हे करून गुन्हेगार तुरूंगात जातात. एखाद्याला फाशी दिले, तरी त्याच्या मनातील गुन्हा करण्याचा संस्कार नष्ट होत नाही. तो पुढील जन्मात पुन्हा तसेच गुन्हे करतो. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभात मध्ये गुन्हेगार, राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांना साधना करण्याची शिक्षा देण्यात येईल, असे जे छापण्यात येते, त्याचे महत्त्व असे आहे की, साधनेमुळे गुन्हा करण्याचा संस्कार मनातून पुसला जातो. त्यामुळे या जन्मीच काय, तर पुढील जन्मीही त्याच्याकडून गुन्हे होत नाहीत. एवढेच नव्हे, तर साधनेमुळे गुन्हा केल्यामुळे लागणार्‍या पापाची तीव्रताही न्यून होण्यास साहाय्य होते; कारण साधना करणे हे एकप्रकारे प्रायश्‍चित्तच असते. – डॉ. आठवले (१७.२.२०१४)

Leave a Comment