ख्रिस्ती बायबल वाटतात; म्हणून श्रीमद्भगवद्गीता वाटणारे हिंदू !

ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी बायबल वाटतात. त्यांना प्रत्युत्तर म्हणून काही हिंदू श्रीमद्भगवद्गीता वाटतात आणि अभिमानाने सांगतात, आम्ही गीतेच्या सहस्र प्रती समाजात वाटल्या. त्यांना हे कळत नाही की, बायबलमध्ये मानसिक स्तरावरची थोडीफार शिकवण आहे, तर गीतेत अत्युच्च स्तरावरची आध्यात्मिक शिकवण आहे. ती केवळ अभ्यासू किंवा चांगले साधक यांनाच कळू शकते. बहुसंख्य हिंदूंना गीता कळत नसल्यामुळे ते तिला कपाटात ठेवतात. हिंदूंना खरोखरंच धर्मशिक्षण द्यावेसे वाटत असेल, तर त्यांनी प्राथमिक स्तराची पुस्तके देणे आवश्यक आहे. – डॉ. आठवले (२२.२.२०१४)

Leave a Comment