ईश्वरप्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाचा गुरूंनी सांगितलेली सेवा झोकून देऊन करतांना कितीही संघर्ष झाला, तरीही त्याने तो सहन करणे आवश्यक !

‘जर एखाद्या साधकाने सर्वसंगपरित्याग करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे, तर त्याने गुरु सांगतील ती सेवा झोकून देऊन करावी, मग कितीही संघर्ष करावा लागला, तरी चालेल. या संघर्षाचे फळ गोडच असते. गुरु शेवटी साधकाला चिरंतन अशा आनंदमय ईश्वराची प्राप्ती करून देतातच; परंतु मायेचे तसे नसते. मायेत होणारा संघर्ष शेवटी आपल्या पदरात दुःखच टाकतो. तो आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकवतो.

तात्पर्य : मायेत अडकवणार्‍या भावनेतील विचारांमध्ये रहाण्याऐवजी ज्या देवाने आयुष्य दिले आहे, त्या देवाला अनुभवण्यासाठी भावस्थितीत रहाण्याचा अखंड प्रयत्न करावा.

– श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)

Leave a Comment