देहासाठी जसा श्वास आवश्यक आहे, तसे साधनेसाठी सेवा आवश्यक आहे !

१. ‘स्वतःची प्रगती व्हावी’, असे वाटत असेल, तर साधकाने पूर्ण अंतर्मुख झाले पाहिजे !
२. साधकाच्या मनावर परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार झाला की, त्याचा साधनेतील वेळ वाया जात नाही !
३. साधना कृतज्ञतापूर्वक करायला हवी. सतत देवाला नमस्कार करून त्याच्या चरणी अक्षरशः लोळण घेतली की, तो मार्ग दाखवणारच !
४. ‘भगवंताला क्षणोक्षणी मन अर्पण करणे’, ही खरी कृतज्ञता आहे.
५. पदार्थात मीठ नसेल, तर जेवणाला अर्थ नसतो; तसे जीवनात भगवंत नसेल, तर जीवनाला अर्थ उरत नाही.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

Leave a Comment