गुरूंप्रती कृतज्ञता किती वाटते, त्यावर साधनेतील प्रयत्न अवलंबून असतात !

श्रीगुरूंनी आपल्याला भरभरून दिले आहे. त्यांच्याप्रती आपल्याला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते, यावर साधनेतील प्रयत्न अवलंबून असतात. साधनेत अल्पसंतुष्टता नको. ‘पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत’, याची जाणीव ठेवूया. ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, हाच गुरूंचा संकल्प आहे. सर्व साधक अध्यात्मात कधी पुढे पुढे जाण्याची गुरुदेव वाट पहात आहेत. आपण केलेले लहान लहान प्रयत्न पाहूनही गुरूंना आनंद होतो. ते प्रयत्नही गुरूंच्या कृपेनेच झालेले असतात. अर्जुनाने जेव्हा माशाचा डोळा भेदण्याचे ध्येय ठेवले, त्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, तू सतर्क रहा आणि ध्येयाकडे लक्ष दे. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की, ‘श्रीकृष्णा, तू काय करणार ?’, त्या वेळी श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘तू जे करू शकत नाही, ते मी करणार !’’ (म्हणजेच पाण्यातील माशाचा डोळा भेदण्यासाठी पाणी स्थिर ठेवण्याचे कार्य भगवान श्रीकृष्ण करणार होता.)

– श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

Leave a Comment