रज-तम प्रधान वातावरणातही साधकांची तळमळीने काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविना कोण आहे ?

गुरुदेवांचा प्रत्येक श्वास हा साधकांसाठीच असतो. त्यांना प्रत्येक क्षणी साधक आणि साधकच डोळ्यांसमोर दिसतात. गुरूंचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक विचार हा त्यांच्या साधकांसाठीच असतो. ‘आज साधकांसाठी काय करू ?’, ‘समष्टीसाठी काय देऊ ?’, अशीच त्यांची तळमळ असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे आणि त्यांच्या प्रीतीमुळेच साधकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र पालट होत आहेत. साधकांचे जीवन आनंदी होऊन ते या घोर कलियुगात रज-तम वातावरणात रहात असूनही मोकळा श्वास घेत आहेत. सनातनचा प्रत्येक साधक आणि त्यांचे कुटुंब यांचीही ते काळजी घेत आहेत. अशी काळजी घेणारे या पृथ्वीवर दुसरे कोण आहे ?

– श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

Leave a Comment