तिस-या महायुद्धाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सक्षम होणे आणि स्वतःचे रक्षण होणे यांसाठी तीव्र तळमळीने साधना करा !

‘तिसरे महायुद्ध जसे जवळ येत आहे, तशी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापूर्वी वाईट शक्ती साधक आणि समाज यांवर आक्रमण करत होत्या. आता आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने, तसेच तिसरे महायुद्ध जवळ आल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणाचे प्रमाणही त्या तुलनेत वाढत चालले आहे. आता वाईट शक्ती संतांवरही आक्रमण करत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे समाज, साधक आणि संत यांनी एक क्षणही वाया न घालवता प्रत्येकाने स्वतःची साधना वाढवावी. सर्व साधक आणि संत यांनी तिसर्‍या महायुद्धाला सामोरे जाण्यासाठी सक्षम होणे आणि त्यातून स्वतःचे रक्षण होणे यांसाठी तीव्र तळमळीने साधना करण्याविना पर्याय नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.९.२०२२)

Leave a Comment