म्हातारपणात स्वतःची मुले नाहीत, तर साधना हाच खरा आधार !

‘सध्याच्या काळात आई-वडील मुलांना वाढवतांना त्यांच्या मनात ‘मुले आपल्याला म्हातारपणी सांभाळतील’, असा सुप्त विचार कुठेतरी असतो. प्रत्यक्षात मुलगा मोठा झाला की, तो नोकरीसाठी दुसर्‍या गावी जातो आणि मुलगी सासरी जाते. शेवटी वय झालेल्या आई-वडिलांच्या मुलांच्या संदर्भातील आशा-आकांक्षांवर पाणी पडते. ही वस्तूस्थिती पहाता प्रश्न पडतो, ‘आई-वडील आपल्या आयुष्यातील उमेदीची ३० – ३५ वर्षे अशा खोट्या आशा-आकांक्षांसाठी खर्च का करतात ?’, त्यापेक्षा त्यांनी तो वेळ साधनेला द्यावा. त्यामुळे त्यांचे केवळ म्हातारपणच नाही, तर पुढचे अनेक जन्मही आनंदात जातील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.९.२०२१)

Leave a Comment