चरणांवर डोके टेकवतात आणि हात आशीर्वाद देतात !

‘चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत आहे. चरणांना हा मान मिळत असल्याने हातांनी चरणांना विचारले, ‘सर्व जण तुझ्याच पाया का पडतात ?’ तेव्हा चरणांनी हातांना पुढील दोन प्रकारे समजावले.

१. ‘मी भूमीवर असतो; म्हणून सर्व जण माझ्यावर डोके टेकवून नमस्कार करतात. त्यासाठी तुलाही भूमीवर यावे लागेल. भूमीवर यावे लागेल, म्हणजे अहं न्यून करावा लागेल. अहं न्यून केल्यावरच आपल्याला मान-सन्मान मिळतो.’

२. ‘तू सर्वांना आशीर्वाद देतोस ना ! प्रत्येकाचे कार्य निरनिराळे असते. तुझे आशीर्वाद देण्याचे कार्य मला करता येत नाही. प्रत्येकाने ईश्वरनियोजित असलेल्या आपापल्या कार्यात समाधान मानायला हवे आणि तसे केल्यानेच आनंद मिळतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी.

Leave a Comment