सनातन संस्था शिकवत असलेली समष्टी साधना ही काळानुसार आवश्यक साधना असणे

‘सध्या अनेक संत आणि संप्रदाय त्यांच्या भक्तांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी भजन, कीर्तन, नामजप, ध्यान यांसारख्या विविध साधना शिकवतात. यातून केवळ साधना करणार्‍या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते. ती व्यष्टी साधना होते. सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांवर सर्व बाजूंनी आक्रमण होत असतांना ‘मी आणि माझी साधना’ या कोषात राहिलो, तर धर्म आणि राष्ट्र यांचा नाश होईल. आपणही धर्म आणि राष्ट्र यांचा घटक असल्यामुळे आपण कितीही व्यष्टी साधना केली, तरी आपलाही निभाव लागणे कठीण आहे. हे टाळण्यासाठी सनातन संस्था साधकांना वैयक्तिक साधनेच्या समवेत काळानुसार आवश्यक अशी धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजामध्ये जागृती करण्याची, म्हणजेच व्यष्टी साधनेबरोबर समष्टी साधनाही शिकवत आहे ! ’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment