मनोलय झालेल्या संतांच्या कृतीचा मानसिक स्तरावर अर्थ काढू नये !

‘काही वेळा काही संतांचे वागणे बघून काहींना वाटते, ‘यांना मनोविकार झाला आहे का ?’ अशा वेळी हे लक्षात घेतले पाहिजे की, संतांचा मनोलय झालेला असल्यामुळे त्यांना कधीच मनोविकार होत नाही. त्यांचे वागणे हे त्या परिस्थितीला आवश्यक किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संत हे ईश्वराचे सगुण रूप असल्यामुळे त्यांच्या वागण्याचा कार्यकारणभाव सर्वसाधारण व्यक्तीला कळणे कठीण असते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.११.२०२१)

Leave a Comment