सिद्ध, अवलिया, योगी आणि संत यांनी सूक्ष्मातील जाणणे

सिद्ध, अवलिया, योगी आणि संत हे सतत निर्विचार स्थितीत असतात. त्यांना स्वतःचे असे काही विचार नसतात. ‘त्यांचे सर्वच ईश्वरेच्छेने चालू आहे’, याचे ज्ञान त्यांना झालेले असते. हे सिद्ध मायेच्या भौतिक जगात नसून दैवी जगात वावरत असतात. ते सतत ईश्वरी अनुसंधानात असतात. त्यांच्या मनाची निर्विचार स्थिती असल्याने त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अधिक असते. ते बाह्यतः अतिसामान्य दिसत असले, तरी आतून ते असामान्य असतात. सिद्धांना ओळखणे कठीण असते.

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment