अध्यात्मात तेजतत्त्वापेक्षा सूक्ष्म असलेल्या आकाशतत्त्वाची अनुभूती कानांनी येत असल्याने डोळ्यांपेक्षा कान हे श्रेष्ठ ज्ञानेंद्रिय असणे

‘आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या सर्व अवयवांमध्ये आपला सर्वात महत्त्वाचा अवयव डोळे असतात’, असे आपल्याला जाणवते. त्यामुळे ‘डोळे हा मनाचा आरसा असतात’, असेही म्हणतात; परंतु सृष्टीतील पंचभौतिक पदार्थांचे ज्ञान करून घेण्यासाठी ईश्‍वराने आपल्याला पंचज्ञानेंद्रिये दिली आहेत. पंचज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांनी तेजतत्त्वाची अनुभूती येते, तर कानांनी आकाशतत्त्वाची अनुभूती येते. आकाशतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा अधिक सूक्ष्म असल्यामुळे कानांच्या माध्यमातून अधिक उच्च स्तरावरील अनुभूती येते. त्यामुळे अध्यात्मात कान हे अधिक श्रेष्ठ ज्ञानेंद्रिय आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले.

Leave a Comment