सर्वांमध्ये भगवंताचे रूप पाहून त्यांना नमस्कार करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

‘देवद आश्रमात एक हितचिंतक आले असतांना महाराजांनी त्यांना वाकून नमस्कार केला.

एका साधिकेची भावस्थिती पाहून महाराजांनी त्यांनाही वाकून नमस्कार केला.

‘एका साधकाच्या घराच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला’, हे कळल्यावर महाराजांनी आनंदाने साधकाच्या पायाला हात लावून नमस्कार केला.

ही सर्व उदाहरणे पाहिल्यावर ‘परात्पर गुरु पांडे महाराज वयोवृद्ध आणि तपोवृद्ध असूनही त्यांचा अहं किती अल्प आहे’, हे लक्षात येते. चराचरात भगवंताला पाहून त्याला नमस्कार करणे, हे उच्च स्तराच्या भावावस्थेचे लक्षण आहे.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याप्रमाणे आपल्यातही विनम्रता आणि भावावस्था येण्यासाठी साधकांनी प्रयत्न करावेत !’

Leave a Comment