स्वतःतील ‘मी’ ला विसरून चैतन्याशी अनुसंधान ठेवा !

साधकांनो, आपत्काळ चालू झाल्याची चिन्हे आता दिसून येत आहेत. विविध माध्यमांतून साधकांना होणारे त्रास, हे त्याचेच लक्षण आहे. या त्रासातही आनंदी राहून परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनेद्वारे चैतन्याचा जागर करा !

स्वतःतील चैतन्याचा जागर कसा करायचा ?

स्वतःतील ‘मी’ ला विसरून चैतन्याशी अनुसंधान ठेवा !

आपण देवीचे तत्त्व जागृत होण्यासाठी तिचा जागर करतो. त्याचप्रमाणे आपल्यातील ‘मी’ ला विसरून, चैतन्याला समोर आणून, म्हणजेच सतत चैतन्याशी अनुसंधान ठेवून त्याचा जागर करा ! म्हणूनच संत भक्तराज महाराज म्हणतात, देह प्रारब्धावरी सोडा । चित्त चैतन्यासी जोडा । आणि वेड्या वेड्या पहातो काय । जातो क्षण हा वाया ।

Leave a Comment