भगवंताच्या अनुसंधानात राहून केलेल्या कर्मावर भगवंताचे नियंत्रण रहाणे

कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण ठेवणे हे केवळ भगवंताच्या हातात असते. भगवंताच्या अनुसंधानात राहिले की, भगवंत तिच्यावर नियंत्रण ठेवतो; कारण ते त्याचे नियोजन आहे. तो निर्माता आहे. तो अंतर्बाह्य दोन्ही ठिकाणी आहे. आपण अंतरंगात जाऊ शकत नाही; परंतु भगवंत अंतरस्थ असल्यामुळे तो नियंत्रण ठेवू शकतो. तो सर्वत्र असून प्रभावशील नियोजक असतो. त्याचे नामस्मरण, भजन, क्षमायाचना आणि शरणागती हे त्याचे अनुसंधान ठेवण्याचेे मार्ग असून त्याच्या माध्यमातूनच कृतींवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होते.

Leave a Comment