कर्मनियंत्रणासाठी भगवंताशी सतत अनुसंधानित रहाण्याची आवश्यकता !

कर्म नियंत्रणात असेपर्यंत सुधारणा करणे शक्य असणे

‘एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे, तोपर्यंत तिच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीतील सत्य-असत्य आणि परिणाम जाणून कृत्य केले पाहिजे, उदा. अन्न घशातून आत जाण्यापूर्वी त्यावर आपले नियंत्रण पाहिजे. एकदा ते पोटात गेले की, त्यावरील आपले नियंत्रण संपते. बोलण्याचेसुद्धा असेच आहे. आपल्या मुखातून बोल निघेपर्यंत विचार करूनच बोलले पाहिजे. मुखातून शब्द बाहेर पडल्यावर आपले त्यावरील नियंत्रण जाते. त्यामुळे नंतर त्यातून उद्भवणारे परिणाम भोगावे लागतात. लिखाण करतांनाही ते आपल्या हातात असेपर्यंतच व्यवस्थित करता येते. त्यातील चुका सुधारता येतात. त्यानंतर ते पुढे गेले की, आपल्या नियंत्रणाबाहेर गेले. मग केवळ त्याचे परिणाम भोगणेच शिल्लक रहाते. प्रत्येक कर्माच्या संदर्भातही असेच असते. एकदा का ते आपल्या हातून घडून गेले की, त्यात पालट करणे वा थांबवणे आपल्या हातात नाही. ते जोपर्यंत आपल्या नियंत्रणात असते, तोपर्यंत आपल्याला त्याचे परिणाम (किंवा दुष्परिणाम) भोगावे लागत नाहीत. त्यामुळे प्रत्येक कर्म करतांना भगवंताचे स्मरण करून विचारपूर्वक करणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment