अधोगतीला नेणारे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, उच्छृंखलपणा !

शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. गुन्हेगारांना गुन्हे करायला, रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ?

१. स्वेच्छेने, परेच्छेने आणि ईश्‍वरेच्छेने वागणे

१ अ. स्वेच्छेने वागणे : एखादा स्वैराचारी, स्वेच्छेने वागणारा घरी कसा वागतो, याचा समाजाशी संबंध येत नाही; पण जेव्हा तो समाजात स्वेच्छेने वागायला लागतो, तेव्हा त्याच्या विकृत वागण्याचा समाजावर दुष्परिणाम होतो. समाजस्वास्थ्य राखणे, हे सर्वांचेच कर्तव्य आहे. समाज चांगला असला, तरच तो राष्ट्राचे रक्षण करू शकतो. राष्ट्र टिकले, तरच समाज टिकतो आणि समाज टिकला, तरच व्यक्ती टिकू शकते. यावरून व्यक्तीस्वातंत्र्य हा शब्द किती अयोग्य आहे, हे लक्षात येईल. स्वेच्छेने वागणार्‍यांची अधोगतीच्या दिशेने वाटचाल होते; कारण येथे मी म्हणजे अहं हा केंद्रबिंदू असतो. व्यक्तीस्वातंत्र्यामुळेच सध्या समाजाची स्थिती पूर्वी कधी नव्हती इतकी दुःखद झाली आहे.

१ आ. परेच्छेने वागणे : समाजात कसे वागावे हे कळत नसल्यास सज्जन व्यक्ती सांगतील तसे वागावे, म्हणजे समाजस्वास्थ्य राखले जाते. याला परेच्छेने वागणे म्हणतात.

१ इ. ईश्‍वरेच्छेने वागणे : पुढच्या टप्प्याला सज्जन व्यक्तीऐवजी साधक किंवा संत सांगतील तसे वागावे. त्यामुळे समाज सात्त्विक होत जाईल. असे वागण्याला ईश्‍वरेच्छेने वागणे म्हणतात. याचा आणखी एक लाभ म्हणजे साधना होऊ लागते.

२. मुसलमानाचे कुराणाच्या आज्ञेप्रमाणे वागणे

मुसलमान कुराणाच्या आज्ञेप्रमाणे वागतात. ते कधी व्यक्तीस्वातंत्र्य हा शब्द उच्चारतही नाहीत. त्यामुळे जगात ते सामर्थ्यवान असल्याचे दिसून येते.

– (प.पू) डॉ. आठवले (२.११.२०१४)

Leave a Comment