प्रकृतीनुसार आणि काळानुसार त्या त्या देवतेची उपासना करणे आवश्यक

गुरुप्राप्ती होईपर्यंत पुढील तत्त्वे लक्षात घेऊन त्यानुसार साधना केल्यास प्रगती लवकर होते.

१. व्यष्टी साधना : प्राथमिक टप्प्याची साधना म्हणजे कुलदेवतेची उपासना आणि त्या त्या देवतेची तिच्या त्या त्या सणांच्या दिवशी, तसेच अमावास्या इत्यादी दिवशी करायची उपासना. पुढे गुरुप्राप्ती झाल्यावर गुरु सांगतील, ती उपासना करायची असते.

२. समष्टी साधना : ही अधिकतर काळानुसार असते, उदा. २०२२ या वर्षी हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत धर्मराज्य स्थापन करणार्‍या श्रीकृष्णाची, तर २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर आदर्श राज्य, म्हणजे रामराज्य करणार्‍या श्रीरामाची उपासना करणे लाभदायक ठरते.

– प.पू. डॉ. आठवले (२४.६.२०१४)

Leave a Comment