बुद्धीप्रामाण्यवादी आणि प.पू. डॉक्टर यांच्या दृष्टीकोनांतील मूलभूत भेद म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसणे आणि प.पू. डॉक्टरांना जिज्ञासा असणे

बरेच ज्योतिषी माझा मृत्यूयोग जवळ आल्याचे गेली १० वर्षे सांगत आहेत. काही ज्योतिषांना मी जिवंत आहे, हे पाहून आश्‍चर्य वाटते. हे ऐकल्यावर बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतील, बघा. आम्ही म्हणतो ना, ज्योतिषशास्त्र खोटे आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले ! याउलट माझ्या मनात विचार येतो, माझा मृत्यूयोग असूनही मी गेली १० वर्षे जिवंत असण्याचे कारण काय ? जिज्ञासेमुळे या प्रश्‍नाचे उत्तर मला विविध संतांकडून मिळते. त्यावरून जिज्ञासू ज्ञानाचा अधिकारी आहे, या प.पू. भक्तराज महाराज यांच्या उक्तीचे महत्त्व पुन्हा एकदा मनावर ठसते.

जिज्ञासेमुळेच अध्यात्मविषयक ग्रंथांत नसलेल्या हजारो प्रश्‍नांची उत्तरे मला विविध माध्यमांतून मिळाली आहेत. त्यामुळेच जगभरचे जिज्ञासू आणि साधक सनातनच्या ग्रंथांचे वाचक झाले आहेत आणि होत आहेत.
– (प.पू) डॉ. आठवले (९.१२.२०१४)

Leave a Comment