बळी राजाची भक्ती

शुक्राचार्यांनी बळीला सांगितले, ‘हा वामन नाही, श्रीविष्णु आहे’. तेव्हा बळी राजा म्हणाला, ‘धन्य गुरुमहाराज’. गुरु त्यालाच म्हणतात, जो भगवंताचे दर्शन करवतो.

देहाला मलीनता येण्याची कारणे

१. नेत्र : परनारीला पहाणे. (उपाय : तिला पर नारी म्हणून नाही, तर देवी, आई किंवा बहीण म्हणून पहा.)

२. कान : परनिंदा ऐकणे

३. जीभ : दुसऱ्यांचे दोष सांगणे

४. मन : विषयाचा संग करणे.



अवतारांच्या प्रत्येक कृतीमागे मोठा अर्थ असतो !

वामनावतारामध्ये वामन आणि दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्यातील पुढील संवाद झाला.

शुक्राचार्य : माझा एक डोळा का फोडलास ?

वामन : तुझा विज्ञानाचा डोळा चांगला आहे; पण वैराग्याचा डोळा योग्य नाही.

शुक्राचार्य : डोळा संकल्पाने न फोडता कुशाने का फोडलास ?

वामन : तू आपली बुद्धी कुशाग्र समजत होतास; म्हणून तुझी बुद्धी कुशाग्र होण्यासाठी कुशाने फोडला !

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment