गोष्टीरूप अध्यात्म

सर्वजण कोणत्या ना कोणत्या चक्रात पडतात; पण जे चक्रधारीच्या (श्रीकृष्णाच्या) चक्रात पडतात, ते संसारचक्रातून वाचतात.

हिंसेपोटी भीती : सिंह हत्तीला मारतो, तरीही तो वनात जातांना मला कोण मारणार तर नाही ना, या भीतीने मागे-पुढे पहात जातो. सिंहाला कोण मारणार ? पण सिंह हिंसा करत असल्याने त्याला भीती वाटते.

ज्ञानाचा दिवा आणि संयमाचा आरोध (ब्रेक) नसेल, तर गाडी भरकटते तसे जीवन भरकटत जाईल.

बहुतेकांना मुक्ती नको असते !

प्रल्हाद : देवा, तू सगळ्यांना मुक्ती का देत नाहीस ?

देव : मी सिद्धच आहे; पण घ्यायला कोणी सिद्ध नाही.

त्यानंतर देवाने एका डुकराला विचारले.

देव : स्वर्गाला येतोस का ?

डुक्कर : स्वर्गाला येईन; पण बायको आणि मुले यांना आणता आले, तरच येईन.

देव : हो चालेल.

डुक्कर : पण स्वर्गात घाण आहे का ?

म्हणून उन्नतांच्या पाया पडतात.

१. रजोगुणाचा नाश संतांच्या चरणरजाने (धुळीने) होतो; म्हणून उन्नतांच्या पाया पडतात.

२. करमाबाई डाळ-तांदुळाची खिचडी करत असत. प्रतिदिन गोविंद (कृष्ण) खिचडी खाण्यासाठी येत असे. लोक विचारत, तू खिचडीत कोणता मसाला घालतेस ? ती सांगायची, गुरूंच्या चरणांच्या धुळीची एक चिमटी घालते. ती खावयास गोविंद लालचावलेला आहे.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment