भक्ताचा सकारात्मक दृष्टीकोन

एका देवभक्ताच्या आठ मुलांपैकी सात मुले साथीच्या रोगात मेली. त्यांच्या नाास्तिक शेजाऱ्यांनी विचारले, ‘कारे बाबा, कुठे आहे तुझा देव ? आणि कुठे ऐकली देवाने तुझी प्रार्थना ?’ देवभक्त म्हणाला, ‘माझ्या नशिबात माझी आठही मुले मृत होणार होती; पण प्रभुकृपेमुळेच एक मुलगा वाचला’.

समाज

१. सुदृढ समाज : ज्या समाजात स्थैर्याची भावना आहे, कला-वाङ्मयाची जोपासना केली जाते, कोणाची पिळवणूक केली जात नाही, फसवणुकीची भीती नाही, असा समाज.

२. बिघडलेला समाज : जेथे फसवणूक, लबाडी, अन्याय आणि व्यक्तीव्यक्तीच्या मनात आपल्या भवितव्याबद्दल चिंता आहे, असा समाज.

२ अ. परिणाम : अशा बिघडलेल्या समाजाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत असतो. त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होत असतो. चुकीच्या मनोधारणेने आपण दुसऱ्याच्या हितासाठी काम करत आहोत, अशी भावना मनुष्याच्या मनात आली की, त्याने मनात ताण निर्माण होत असतो. ही परिस्थिती पालटून जेव्हा सहकार्य आणि समर्पण या पायऱ्यांनुसार समाज सुदृढ होऊ लागेल, तसतसे हे तणाव न्यून होतील. त्यासाठी व्यक्तीव्यक्तीत सहकार्य आणि समर्पण यांची भावना निर्माण व्हावयास हवी. म्हणजे पर्यायाने कुटुंब, पेठ, वस्ती, नगर आणि देश या सर्वांची प्रकृती सुधारेल.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले. (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment