देहासक्ती नको !

देह सांडावा ना मांडावा ।

येणे परमार्थचि साधावा ॥

सांडोनिया देहाभिमान ।

ब्रह्मसमाधान पावले ॥

– एकनाथी भागवत २०.१४७

अर्थ : देह सोडून देऊ नये आणि त्याचे लाडही करू नयेत. देहाभिमान सोडून साधना करून परमार्थ साधावा. त्याने ब्रह्मरूप झाल्याचे समाधान मिळते. एकनाथ महाराजांनी याचे एक उदाहरण दिले आहे. पक्षी वृक्षावर घरटे करून रहातो. निर्दय मनुष्य झाड तोडू लागला, तर गृहाभिमान सोडून पक्षी उडून गेला, तरच त्याचे कल्याण आहे. तसेच जीव देहात अडकला, तर त्याचे अकल्याण आहे; कारण देहाला मरण आहे.

सद्गुरूंची आवश्यकता !

स्त्रियांचे केस गुंतले की, त्यांना ते स्वतःला सोडवता येत नाहीत. त्याचप्रमाणे त्रिगुणांची (सत्त्व, रज आणि तम यांची) वेणी स्वतःला सोडवता येत नाही. त्यासाठी सद्गुरु लागतो.

– (पू) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द २०१०)

Leave a Comment