‘जो इतरांचा विचार करतो, त्याचा देवच विचार करतो’
‘जो इतरांचा विचार करतो, त्याला स्वतःचा विचार करण्याची आवश्यकता उरत नाही; कारण देवच त्याचा विचार करतो.’
‘जो इतरांचा विचार करतो, त्याला स्वतःचा विचार करण्याची आवश्यकता उरत नाही; कारण देवच त्याचा विचार करतो.’
‘कलियुगात साधना करणार्या व्यक्ती सापडणे कठीण आहे आणि साधना करणारे साधक भेटणे त्याहूनही कठीण आहे. एखाद्या कुटुंबातील एक साधक साधनेत असेल, तरी तो साधक आणि त्याचे कुटुंब यांची केवढी मोठी पुण्याई आहे. त्या पुण्याईला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्यासाठी आपल्याला त्या साधकांना भेटावे लागते.’
‘माझ्याकडे कुणी लक्ष देत नाही’, असा विचार करायला नको. आपण जे काही करतो, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद देवाकडे होत असते. आपल्याला असे वाटणे; म्हणजे आपल्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. आपल्या संदर्भात जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते. देव कधीच चुकीचे करणार नाही. ‘देव आणि मी’, याकडेच आपण लक्ष द्यायचे. ‘कोण कसे वागते ?’, याकडे लक्ष … Read more
‘देवाच्या नियोजनाप्रमाणे ईश्वरी राज्य जेव्हा यायचे, तेव्हाच येणार आहे. ती अपेक्षाही नको. साधकाने ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे ध्येय ठेवून साधना करायला नको. ‘मला ईश्वर हवा आहे’, या ध्येयासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. काळानुसार ईश्वरी राज्याची स्थापना होणारच आहे. त्यासाठी आपण वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. साधना करतांना साधकाची सात्त्विकता वाढल्यावर त्याचे फळ म्हणून आपोआपच ईश्वरी राज्याची स्थापना … Read more
अ. परात्पर गुरु डॉक्टर काही वेळा त्यांनी स्वतः केलेले लिखाण मला पडताळण्यासाठी देतात. मी त्यामध्ये काही लहानसहान सुचवले असले, तरी ते साधकांना सांगतात, ‘‘बरे झाले. आता लिखाण अजून परिपूर्ण झाले.’’ ‘सनातनचे कोणतेही कार्य परिपूर्ण व्हायला हवे’, ही त्यांच्यासारखी तळमळ आपणही ठेवली, तर दुसर्यांनी आपल्या सेवेत चुका दाखवल्यास आपल्याला वाईट वाटणार नाही. आ. ‘चुकांतून देव आपल्याला … Read more
‘आपण जसे प्रतिदिन अन्नपाणी ग्रहण करतो, तसे प्रतिदिन भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपले नित्य कर्म आहे. ते केल्यानेच आपण आपत्कालात जिवंत राहू शकतो.’
‘वर्ष २००० ते २००३ या काळात फोंडा येथील सुखसागर सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः साधकांसाठी सत्संग घेत असत. त्या वेळी नुकतेच वाईट शक्तींचे त्रास चालू झाले होते. साधकांना पुष्कळच त्रास होत होते. त्या कालावधीपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला ‘वाईट शक्तींचे जग कसे असते ?’ याविषयी माहिती द्यायला प्रारंभ केला. त्या वेळी त्यांनी … Read more
‘काळाला अनुकूल अशी आपली साधना हवी. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना केवळ व्रते करण्यापेक्षा घरोघर जाऊन निद्रिस्त समाजाला साधना सांगून त्याला जागृत केले पाहिजे, म्हणजेच समष्टी साधना केली पाहिजे. समाजाला योग्य-अयोग्य गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. सर्व समाजाचे उत्थापन म्हणजेच हिंदु राष्ट्राची निर्मिती !’
‘जे बुद्धीप्रामाण्यवादी ‘देव नाही’ म्हणतात, त्यांना भक्तांना येते, तशी चिरंतन आनंदाची अनुभूती कधी येईल का ?’
‘निश्चययुक्त आत्मतत्त्वात रत रहाणारे (गुरु) जीवनमुक्त असतात.’ (महोपनिषद्, अध्याय ६)