चित्तशुद्धीसाठी एक वेगळा विचार !

इंद्रिये, पञ्चतन्मात्रा इत्यादींमध्ये व्यक्त होणार्‍या चैतन्याच्या अंशालासुद्धा ‘देवता’ म्हणण्याची पद्धत आहे. उदा. वाणीची देवता अग्नी, कानांमध्ये दिक् देवता, डोळ्यांची सूर्य, त्वचेची वायू, पायांची उपेन्द्र, हातांची इन्द्र इत्यादी. आता, अपरिहार्य नसताना आपण कोणाशी कठोरपणे बोललो, दुसर्‍याला टोचून बोललो, वाणीने कर्कश स्वर काढले तर आपल्या मुखातील वाणीची देवता अप्रसन्न होते, कारण हा वाणीचा दुरुपयोग आहे. त्याचबरोबर ज्याच्या … Read more

सर्व पंथ देवाचेच आहेत

‘मी ‘या’ पंथाचा आहे, तो ‘त्या’ पंथाचा आहे, असे म्हणून थांबू नका, तर ‘सर्व पंथ देवाचेच आहेत’, हे लक्षात घेऊन व्यापक व्हा, म्हणजे देवाच्या जवळ जाल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ज्योतिषशास्त्राचे महत्त्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भक्तीयोग आणि समष्टी सेवा

‘भक्तीयोगानुसार साधना करतांना सर्वांत ईश्‍वर पहाता आल्यावर समष्टी सेवा होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.६.२०२१)

देव आणि आई-वडील यांतील साम्य !

‘आई-वडील मुलाचे लाड करतात आणि नीट वागत नसला, तर त्याला मारतातही. देवाचेही असेच असते. तो सर्वसाधारण भक्ताला भरभरून देतो आणि साधना नीट करत नसल्यास त्याला शिक्षाही करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.६.२०२१)

कैद्यांमधील सत्त्वगुण वाढवण्यासाठी साधना शिकवली पाहिजे !

‘सत्त्व, रज आणि तम’ या त्रिगुणांचा मूलभूत सिद्धांत जगाला सांगणार्‍या भारतातच तुरुंगातील कैद्यांमधील रज-तम अल्प करून त्यांचा सत्त्वगुण वाढवण्यासाठी साधना शिकवली जात नाही. हे भारतासाठी लज्जास्पद होय ! – परात्पर गुरु डॉ. आठवले (१२.६.२०२१)

पोलिसांनो, साधना करण्याचे महत्त्व जाणा !

‘दिवसभर रज-तम प्रधान गुन्हेगारांच्या समवेत राहिल्याने बहुतांश पोलिसांत रज-तम गुण अधिक असतात. पोलीस साधना करत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवरही अनिष्ट परिणाम होत आहे. या रज-तमचा प्रभाव अल्प होण्यासाठी त्यांनी प्रतिदिन जप साधना करणे आवश्यक आहे. आगामी घोर आपत्काळात पोलिसांनाच भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच कठोर साधना करणे आवश्यक आहे.’ – परात्पर गुरु … Read more

साधना करणा-या कुटुंबांमध्येच साधकांप्रमाणे खरी कुटुंबभावना निर्माण होईल !

‘एकत्र-कुटुंब पद्धतीतील व्यक्ती सात्त्विक असतील, तरच एकत्र राहिल्यामुळे त्यांना आश्रमात राहिल्याप्रमाणे समष्टीचा लाभ होतो; परंतु सध्याच्या काळात असे कुटुंब बघायला मिळणे दुर्लभ झाले आहे. आई, वडील, मुलगा, सून अशा चार व्यक्तींचे छोटे कुटुंब असले, तरी चार जणांची चार मते असतात. सर्वजण साधना करायला लागले की, त्यांच्यात आश्रमातील साधकांप्रमाणे खरी कुटुंबभावना निर्माण होईल.’ – (परात्पर गुरु) … Read more

विज्ञान आणि अध्यात्मातील फरक

‘सध्याच्या काळात विज्ञानाने पुष्कळ प्रगती केली आहे’, असे सांगितले जाते. त्याचे एक उदाहरण म्हणून ‘विविध आजारांवर उपाय म्हणून ‘ॲलोपॅथी’ने विविध औषधांचा शोध लावला आहे’, असेही सांगितले जाते; परंतु विज्ञान ‘एखादी घटना घडण्याचे मूळ कारण शोधणे किंवा ‘ॲलोपॅथी’च्या दृष्टीकोनातून आजार होण्याचे मूळ कारण शोधणे आणि त्या मूळ कारणांवर उपाययोजना सांगणे’, करू शकत नाही. त्यामुळेच अनेकांना ‘एखाद्या … Read more