कुठे शास्त्रज्ञ, तर कुठे ऋषि-मुनी !

‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्मदेहाने विश्‍वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ –सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सुखासाठी कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारी सध्याची पिढी !

​‘सांसारिक जीवनात सर्वांत अधिक सुख नवरा-बायको हेच एकमेकांना देतात. त्यामुळे मोठेपेणी ते स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळण्याचे कर्तव्य सोडून स्वतंत्र रहातात आणि त्यांच्याकडे जातही नाहीत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !

​‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई वडिलांविषयी कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते. ​पुढे काही मृत आई-वडिलांनी पूर्वज होऊन कुटुंबियांना त्रास दिल्यास त्यात आश्चर्य ते काय ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समाजपुरुषाने साधना करण्याचे महत्त्व !

‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात रहातात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना असलेला व्यर्थ अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाचा कितीही अहंकार असला, तरी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराविना दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्‍वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती तुच्छ आहे, हे समजून घ्या !

‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वार्थत्यागी सांप्रदायिक

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !

‘‘रागद्वेषामुळे हे इतिहासकार एकमेकांची हजामत करतात. आधुनिक इतिहास लेखनाची भोंगळ, हिडीस तर्‍हा तर आम्ही प्रतिदिनच पहातो; म्हणूनच रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे.’’ – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मे २०१८)