वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !

​‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई वडिलांविषयी कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते. ​पुढे काही मृत आई-वडिलांनी पूर्वज होऊन कुटुंबियांना त्रास दिल्यास त्यात आश्चर्य ते काय ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समाजपुरुषाने साधना करण्याचे महत्त्व !

‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात रहातात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना असलेला व्यर्थ अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाचा कितीही अहंकार असला, तरी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराविना दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्‍वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती तुच्छ आहे, हे समजून घ्या !

‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वार्थत्यागी सांप्रदायिक

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !

‘‘रागद्वेषामुळे हे इतिहासकार एकमेकांची हजामत करतात. आधुनिक इतिहास लेखनाची भोंगळ, हिडीस तर्‍हा तर आम्ही प्रतिदिनच पहातो; म्हणूनच रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे.’’ – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मे २०१८)

केवळ शारीरिक कामापुरती सीमित केलेली योगसाधना, हा भारतियांचा करंटेपणा !

पश्‍चिमेतील कुणी विद्वान योगसाधनेची प्रशंसा करतो, तेव्हा आम्हाला त्याचे महत्त्व लक्षात येते आणि आम्ही त्याला योगसाधनेच्या नाही, तर योगाच्या रूपात स्वीकारतो. तेसुद्धा त्याच्या मूळ रूपात नाही, तर योगाच्या ८ अंगांपैकी केवळ ३ अंगे म्हणजेच आसन, प्राणायाम आणि ध्यान इथपर्यंतच सीमित रहातो. आज योग हळूहळू शरीर आणि प्राण यांचाच व्यायाम होत चालला आहे. आजचे योगगुरुही यम, … Read more

अडचणींकडे पहायचा दृष्टीकोन !

‘पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये; कारण प्रत्येक अडचण ही नवीन प्रगतीची सुवर्णसंधी असते. तसेच तक्रार ही दौर्बल्य आणि निष्ठाशून्यता यांची निशाणी आहे.’ (‘मासिक तत्त्वज्ञान’, १९०७ वैशाख)

जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले