कुठे पाश्‍चात्त्य विवाह तर कुठे हिंदू विवाह !

१. पाश्‍चात्त्य विवाह : हा केवळ शारीरिक स्तरावरचा असतो; म्हणून त्यामुळे पती-पत्नीला एकमेकाचा मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे मनावर ताण येऊन त्यांना मनोविकारतज्ञांकडे जावे लागते. २. हिंदु विवाह : हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर आधार देणारा आहे. आध्यात्मिक स्तरावर दोघांनी एकमेकांना साहाय्य करून सप्तलोक पार करून मोक्षाला जायचे असते. यासाठीच सप्तपदी असते.- … Read more

खरा विकास कशाला म्हणतात, हेही माहित नसलेले राजकारणी !

निवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्ष अन्न, पाणी, शिक्षण, घर इत्यादींसंदर्भात मोठमोठी आश्‍वासने देतात आणि विकास करू या शब्दाचा भूलभुलैया दाखवतात. सर्वसामान्य जनताच नाही, तर सुशिक्षितही त्याला भुलतात. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ६६ वर्षांत जनता देशोधडीला गेली आहे. जनतेला भौतिक, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व तर्‍हेच्या समस्या भेडसावत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला साधनेला लावले असते, … Read more

ज्वलंत राष्ट्राभिमानी सनातन संस्था यांना राजकीय पक्षांचा आणि शासनाचा विरोध होणे

ज्वलंत राष्ट्राभिमानी स्वा. सावरकरांना यांना जसा राजकीय पक्षांनी आणि शासनांनी विरोध केला, तसा विरोध सनातन संस्था आणि हिंदु जनजागृति समिती यांना होत आहे, यात आश्‍चर्य ते काय ? उलट तो विरोध म्हणजे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृति समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रेमाचे ते प्रमाणपत्र आहे ! – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, … Read more

ऋषींचे सूक्ष्मातील कळण्याचे सामर्थ्य

आपण कानाला रिकामी बाटली, वाटी इत्यादी पोकळी असलेली वस्तू लावली, तर आपल्याला आकाशतत्त्वाचा नाद ऐकू येतो. आपल्याला खोलीच्या पोकळीतील नाद ऐकू येत नाही; मात्र ऋषींना आकाशाच्या पोकळीतील नाद ऐकू येतो. यावरून ऋषींची क्षमता केवढी होती, हे लक्षात येते. – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष नवमी, कलियुग वर्ष ५११५ (२.६.२०१३))

हल्लीची हास्यास्पद शिक्षा पद्धत आणि सनातन संस्था सांगत असलेल्या साधना करण्याच्या शिक्षेचे महत्त्व

शिक्षा करण्याचा मूळ उद्देश असा असतो की, गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा करण्यास धजावू नये. हल्लीच्या शिक्षा पद्धतीत हे अजिबात साध्य होत नाही. पुनः पुन्हा तेच तेच गुन्हे करून गुन्हेगार तुरूंगात जातात. एखाद्याला फाशी दिले, तरी त्याच्या मनातील गुन्हा करण्याचा संस्कार नष्ट होत नाही. तो पुढील जन्मात पुन्हा तसेच गुन्हे करतो. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभात मध्ये गुन्हेगार, … Read more

ख्रिस्ती बायबल वाटतात; म्हणून श्रीमद्भगवद्गीता वाटणारे हिंदू !

ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी बायबल वाटतात. त्यांना प्रत्युत्तर म्हणून काही हिंदू श्रीमद्भगवद्गीता वाटतात आणि अभिमानाने सांगतात, आम्ही गीतेच्या सहस्र प्रती समाजात वाटल्या. त्यांना हे कळत नाही की, बायबलमध्ये मानसिक स्तरावरची थोडीफार शिकवण आहे, तर गीतेत अत्युच्च स्तरावरची आध्यात्मिक शिकवण आहे. ती केवळ अभ्यासू किंवा चांगले साधक यांनाच कळू शकते. बहुसंख्य हिंदूंना गीता कळत नसल्यामुळे ते तिला कपाटात … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, धर्माची अद्वितीयता लक्षात घ्या !

धर्म अनादी असून युगेयुगे टिकतो. पंथ आणि संप्रदाय शेकडो वर्षे टिकतात, तर मानसिक स्तरावरच्या हिंदुत्ववादी संघटना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे विचार ५० – ६० वर्षांतच मृतवत होतात. – डॉ. आठवले (२१.२.२०१४)

हिंदु धर्म

मधुमेह किंवा रक्तदाब असलेल्या रुग्णाला औषधे जितकी आवश्यक आहेत, तितकाचा मानवाला हिंदु धर्म आवश्यक आहे. त्याला विसरल्यामुळे हिंदूंची आणि मानवाची अवस्था मरणोन्मुख झाली आहे. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))

हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सनातन प्रयत्‍नशील !

‘हिंदू धर्मांतर करतात; कारण हिंदूंमध्ये धर्माभिमान नाही. हिंदूंना धर्माभिमान नाही; कारण हिंदूंना धर्मशिक्षण नाही. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सनातन प्रयत्‍नशील आहे. हिंदूंच्या दुःस्थितीच्या कारणाच्या मुळाशी जाऊन ते दूर करण्याचा प्रयत्‍न सनातन संस्था करते !’ – डॉ. आठवले (१६.३.२००७)

शिवसेनाप्रमुखांचे हिंदू राष्ट्र-स्थापनेचे विचार सत्यात आणून दाखवणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ! – प.पू. डॉ. जयंत आठवले, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान, ‘सनातन संस्था’

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्यासाठी जीवन वाहून घेण्याची समष्टी साधना करणारे महान कर्मयोगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ! ‘मी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ‘आंतरमहाविद्यालयीन मराठी वाङ्मय मंडळा’ची स्थापना केली. तेव्हा शिवसेनेची ‘विद्यार्थी सेना’ नुकतीच कार्यरत होत होती. तेव्हा कुमार कदम इत्यादी ‘विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांबरोबर माझी जवळीक झाली. तेव्हापासून शिवसेनेबद्दल माझ्या मनात जवळीक निर्माण झाली. ती किती … Read more