आपला देह चैतन्याने भारित होण्यासाठी देवाचा नामजप करा !

‘भगवंत चैतन्यमय आहे. त्यामुळे देवाच्या नावातही, म्हणजे नामजपातही चैतन्य आहे. नामजप करतांना ‘प्रत्येक नामजपामुळे आपल्यामध्ये कण कण चैतन्य साठवले जात आहे’, असा भाव ठेवावा. तीच आपली खरी पुंजी आहे. प्रतिदिन आपली ही पुंजी व्यय (खर्च) होत असते. त्यामुळे आपल्याकडून अधिकाधिक नामजप व्हायला हवा. भ्रमणभाषचा विद्युतघट (बॅटरी) रिक्त झाला की, आपल्याला कळते आणि आपण त्याला भारित करतो; पण आपल्यातील चैतन्याचा साठा आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपण सतत चैतन्याने भारित रहाण्यासाठी सातत्याने नामजप करून चैतन्य साठवण्याचा प्रयत्न करावा. चैतन्य साठवण्याची ओढ आपल्याला लागल्यास आपला नामजप सतत होईल. त्यातील गोडी चाखल्यास तशी ओढ निश्‍चितच लागेल.’