व्यष्टी आणि समष्टी साधना यांतील भेद
व्यष्टी साधनेत ध्यान लागणे, म्हणजे बाहेरच्यांशी संपूर्ण संपर्क तुटणे. याउलट समष्टी साधनेत सर्व ठिकाणी ध्यान असायला हवे. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
व्यष्टी साधनेत ध्यान लागणे, म्हणजे बाहेरच्यांशी संपूर्ण संपर्क तुटणे. याउलट समष्टी साधनेत सर्व ठिकाणी ध्यान असायला हवे. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
अध्यात्मात सर्व सोडावेच लागते. शेष काही ठेवावे लागत नाही. तेव्हाच पूर्णत्वाला जाता येते. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
अ. काळच आयुष्य पुसून टाकतो. आयुष्यातील अडचणींकडे पुष्कळ लक्ष न देता त्यात गुंतणे टाळावे. आपण भावजागृतीचे प्रयत्न करून पुढे जायला हवे. मग आयुष्यातील अडचणी काळाच्या ओघात दूर होतात. आ. आपण जेथे जातो, तेथे आपल्या भावामुळेच स्थानमाहात्म्य निर्माण होते. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
सेवा परिपूर्ण केली, तरच आकाशमंडलात देवतांकडून सेवेची नोंद होते, म्हणजेच पुण्य-संचय होतो. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
साधकांना मृत्यूचे भय कशाला ? एका आश्रमातून (ठिकाणाहून) दुसर्या आश्रमात (ठिकाणी) जाण्याप्रमाणे मृत्यू आहे ! – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
तुम्ही व्यवहाराने केवळ मनुष्याच्या लक्षात रहाता, तर साधना केल्याने देवाच्या नक्कीच लक्षात रहाता. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
आपल्या दृष्टीतच अध्यात्म आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ईश्वरी तत्त्व पाहिले, तर आपल्याला त्या त्या ठिकाणी ईश्वरी तत्त्वाची अनुभूती येते. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
‘भूतकाळातील आठवणींमध्ये न रमता, न रेंगाळता त्यांतील सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्याला वर्तमानकाळात रहायचे आहे. असे केल्यानेच आपल्या भावना संपतात, नाहीतर त्या आपल्याला मायेत अडकवतात. भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपल्या भावनांना संपवण्याचे उत्तम साधन आहे.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
‘भक्तीभावाने ज्ञान मिळवले, तर त्याचा अहं वाटत नाही; परंतु ज्ञानमार्गाने ज्ञान मिळवले, तर अहं निर्माण होण्याची दाट शक्यता असते; म्हणून नित्य भावजागृतीचे प्रयत्न करण्यास अत्यंत महत्त्व आहे. भक्तीमुळे ज्ञानात गोडवा निर्माण होतो, नाहीतर केवळ ज्ञानाच्या इच्छेमुळे मिळालेले ज्ञान रुक्ष भासते.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
‘देवाच्या कृपेनेच आपली प्रत्येक गोष्ट होत आहे’, असा भाव ठेवून प्रत्येक कृती केली, तर ती गोष्ट सोडतांनाही ती भावपूर्ण पद्धतीनेच सोडली जाते. ‘सर्व देवच करतो’, असा भाव असेल, तर कोणतीही गोष्ट करतांनाही काही वाटत नाही आणि ती सोडतांनाही काही वाटत नाही. देवामुळे ‘करणे आणि सोडणे’ या प्रक्रिया सहज होऊन जातात. एखाद्या परिस्थितीतही आनंद आणि परिस्थितीच्या … Read more