परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या साधनेमुळे साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांच्यातील आत्मचैतन्याचे बळ वाढणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगांतर्गत अष्टांग योगानुसार साधना सांगितली आहे. या माध्यमातून साधकांची स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी निरनिराळ्या सत्संगांच्या माध्यमांतून (आढावा सत्संग, स्वभावदोष निर्मूलन सत्संग इत्यादी) ते प्रयत्न करून घेत आहेत. बर्‍याच साधकांनी याचा लाभ करून घेऊन आत्मोन्नती (आध्यात्मिक उन्नती) करून घेतली आहे. साधकांमध्ये आत्मचैतन्याचे बळ वाढल्यामुळे ते निरनिराळ्या संकटांना निर्भयतेने … Read more

सेवा करतांना अंतर्मुख होऊन आपल्यातील आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करा !

‘आपल्यात अंतर्मुखता येण्यासाठी सेवा करण्यापूर्वी शरिरातील इंद्रियांना प्रार्थना करून त्यांची अनुमती घेऊन सेवा करावी आणि सेवा झाल्यानंतर प्रत्येक इंद्रियाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. इंद्रियांना गुलामाप्रमाणे वापरायला नको. सेवा करतांना अंतर्मुख होऊन आपल्यातील आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याचाच अर्थ प्रथम आपण स्वतः ‘आर्य’ व्हायचे (व्यष्टी साधना करायची) आणि सर्व समाजाला आर्य करण्यासाठी (समष्टी साधनेसाठी) प्रयत्न करायचा.’

कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती चैतन्यात असल्याने ‘स्वतःतील चैतन्याची वृद्धी करणे’, हेच जीवनाचे खरे ध्येय !

‘आपण दिवसभर भाव ठेवून कृती केल्यास आपल्यातील चैतन्यावर असलेले आवरण लवकर दूर होते. आपल्या शरिराभोवती चैतन्याचे आवरण निर्माण झाल्यामुळे बाह्य संकटांचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नाही. चैतन्याद्वारे आपण कोणत्याही संकटाला निर्भयतेने आणि सहजतेने सामोरे जाऊ शकतो. अशा रीतीने ‘स्वतःतील चैतन्याची वृद्धी करणे’, हेच जीवनाचे खरे ध्येय आहे. याद्वारेच आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटतो.’

पाश्चात्त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण

‘आज पाश्‍चात्त्य लोक लढाई न करता, आपल्या विचारांचा पगडा दुसर्‍या देशांवर लादत आहेत. दूरदर्शनच्या माध्यमाद्वारे विकारी आणि विलासी, क्रूरता वाढविणारे, हिंसक अन् अराजकता माजवणारे विचार पसरवत आहेत. दैवी विचारांचा लोप होत आहे. ते दुष्ट लोक स्वतः समृद्ध होण्यासाठी अणु बॉम्ब इत्यादी प्रलयकारी शस्त्रे बाळगून, दुसर्‍यांना शांतीच्या नावावर शस्त्रे बाळगण्यापासून परावृत्त करत आहेत. हिडीस नृत्य, बेसूर … Read more

भगवंताप्रती श्रद्धा आणि भाव असण्याचे महत्त्व

आश्रमातील सर्व साधक संन्यासी आहेत. संन्यासी = सं + न्यासी. न्यास = नि + अस् = स्थापन करणे. ज्याचे जे स्थान आहे, त्या ठिकाणी त्याला स्थापन करणे. समेवर (समत्वाने) स्थिर रहाणारा समत्व स्थितीवर असलेला एखादा रोग झाल्याचे समजल्यावर ‘देव मृत्यूचे कारण सांगून घेऊन जात आहे’, या विषयी कृतज्ञता वाटायला हवी : आपल्याला एखादा रोग झाल्याचे … Read more

मायेतील ब्रह्माविषयी कृतज्ञ असणे आवश्यक !

आपण मायेतील ब्रह्माला जवळ करत नाही, तर मायेशी संवाद साधतो. आपण मायेच्या मूळ रूपाला जाणत नाही, उदा. आश्रमातील जांभळे खातांना ती ज्याच्यामुळे मिळाली, त्याची जाणीव आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. ज्या झाडाने जांभळे दिली, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, तर झाड आणि जांभळे काढून देणारा हे दोघेही प्रसन्न होतील. सगुणाची पूजा … Read more

भगवंताची नियोजकता समजून घेण्यासाठी गुरूंची आवश्यकता असणे आणि ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याद्वारे भावसत्संगामुळे लाभणे

‘भगवंताने आनंद घेण्यासाठी मानवाचे शरीर यंत्र निर्माण केले. त्याला सर्व दृष्टींनी साहाय्यभूत होणारी ही सृष्टी आणि हा निसर्ग निर्माण केला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या शक्तींद्वारे भाषण, संगीत, नृत्य आदी माध्यमांद्वारे निर्माण होणारा संबंध, ही नियोजकता समजून घेणे आवश्यक आहे. याचा सर्व दृष्टींनी जीवनात लाभ करून घेण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे साधना … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सनातनच्या साधकांसाठी होणा-या भावजागृती सत्संगाविषयीचा परात्पर गुरु पांडे महाराज यांचा भाव

मनुष्य प्रतिदिन व्यवहारातील रज-तमाच्या प्रभावामुळे त्रस्त रहातो. त्यामुळे तो आनंद आणि शांती यांच्या शोधात असतो. त्या वेळी उपलब्ध असलेल्या उपायांचा लाभ मिळण्यासाठी तो उपाहारगृहातील पदार्थ ग्रहण करतो, दूरचित्रवाहिनी पहातो, मनोरंजन करून घेतो; परंतु हे उपाय क्षणिक रहातात. अशा प्रसंगी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच हा भावजागृतीचा सत्संग मिळत आहे. त्यामुळे आपल्याला प्राप्त होणारा अंतर्गत … Read more

नादानंतर भगवंताशी असलेल्या अनुसंधानतेमुळे जी शांती प्राप्त होते, त्या शांतीची अनुभूती काय वर्णावी ! ती शब्दातीत अनुभूतीजन्यच असते.

दुसर्‍याच्या वैखरीतून कंठाद्वारे प्रतिध्वनित झालेले शब्द ऐकणार्‍याच्या कानाद्वारे ऐकले जाऊन त्या शब्दलहरी कानामध्ये पुन्हा परिवर्तित होऊन त्याला प्राप्त होण्यामुळे भावजागृती होणे दुसर्‍याच्या वैखरीतून कंठाद्वारे प्रतिध्वनित झालेले शब्द ऐकणार्‍याच्या कानात जातात आणि त्या शब्दलहरी कानामध्ये पुन्हा परिवर्तित होऊन त्याला प्राप्त होतात. यात भगवंताची केवढी किमया आहे आणि तेही इतक्या लवकर होते की, ते लक्षातही येत नाही. … Read more

भावसत्संग ऐकत असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांना सुचलेली सूत्रे

‘चैतन्ययुक्त वर्णाद्वारे शब्द कंठातून (ध्वनीयंत्रातून) बाहेर पडतो, तेव्हा त्यातून बाहेर पडणारा शब्दांतील अर्थ चैतन्याने भारीत असतो. तसेच त्यातून प्रगट होणार्‍या नादाने जो आनंद प्रगट होतो, तो नाद निर्गुण असतो. अशा आत्मीयतेने भारलेल्या चैतन्यमय निर्गुणरूपी नादाने जी भावजागृती होते, ती आपल्यातील आत्म्याशी समरस होऊन आनंदाच्या लहरी निर्माण करते; म्हणून आपल्याला जो आनंद होतो, तो अवर्णनीय असतो.